गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाचे संकट आहे. ह्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. विरोधी पक्षाने मात्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील तीन पक्षांचं सरकार कोसळण्याची भाकितं केली जात आहेत. संकटाच्या काळात अशी वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेत्यांना प्रकाश आंबेडकरांनी कडक शब्दांत सुनावलं आहे. ‘भाजपचे चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी कासावीस झाले आहेत. पण त्यांनी पाच वर्षे विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जाऊन विपश्यना करावी,’ असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर हे बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. करोनाची साथ आल्यापासूनच ते लोकांना धीर देत आहेत. ही साथ फार मोठी नसल्याचं त्यांचं मत आहे. त्यामुळं जनतेनं नेहमीप्रमाणे राहावं. तसंच, सरकारनंही याचा बाऊ करू नये, असं ते सांगत आले आहेत. लॉकडाऊनमुळं लोकांना भेडसावणाऱ्या समस्येबद्दल नुकतंच त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आंबेडकरांनी ‘तुम्ही खुदा होऊ नका’ असा सल्लाही दिला आहे. ‘करोनामुळं दगावणाऱ्यांचं प्रमाण फक्त २ टक्के आहे. त्यामुळं अकारण भीती बाळगण्याची गरज नाही. बुद्धाने म्हटल्याप्रमाणे जो जन्माला आला तो मरणारच आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याचे कार्य हाती घ्या. ते न केल्यास माणसे उपासमारीने मरतील. लॉकडाउन वाढवू नका,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा:
हेही वाचा:
हेही वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times