मागील महिन्यात सुशांतसिंह राजपूतनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानं अचानक हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळं अनेकांना धक्का बसला. बॉलिवूड अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही. त्याच्या आत्महत्येवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुशांत बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप होत आहे. कंगना राणावत व अन्य काही मंडळी खुलेआम हा आरोप करत आहे. चित्रपट आणि राजकारणावर नेहमीच हिरीरीनं मतं मांडणाऱ्या कंगनानं अनेकांची थेट नावं घेतली आहेत.
हेही वाचा:
गेल्या काही दिवसांपासून ती करण जोहरला लक्ष्य करत आहेत. सुशातसिंह आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक निर्माते व दिग्दर्शकांची चौकशी झाली आहे. मात्र, करण जोहरला अजूनही चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. मुंबई पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यावरून कंगना भडकली आहे. ‘ हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य यांचा मित्र असल्यामुळंच त्याला अजून चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही, असा आरोप कंगनानं केलाय. त्याचबरोबर, तिनं मुंबई पोलिसांनाही लक्ष्य केलंय. सुशांतसिंहच्या हत्येची ही थट्टा थांबवा, असं तिनं मुंबई पोलिसांना ट्विटरवर ‘टॅग’ करून म्हटलं आहे.
‘मुंबई पोलीस बेधकडकपणे असा पक्षपात कसे करू शकतात? मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. पण करण जोहरची वेळ आली तेव्हा मॅनेजरला समन्स पाठवण्यात आलं. त्याची चौकशी का नाही? साहेबांना त्रास होऊ नये म्हणून का?,’ असा सवाल कंगनानं केला आहे.
बॉलिवूडमधील अनेक तारेतारकांशी आदित्य ठाकरे यांची मैत्री आहे. त्याबदद्लच्या चर्चा अधूनमधून होत असतात. अलीकडेच नीतेश राणे यांनी मुंबईतील कोविड सेंटरमधील घोटाळ्याचे आरोप करताना याचा उल्लेख केला होता. महापालिकेचे टेंडर वांद्र्यातील अभिनेते व त्याच्या मित्रांना विचारून काढले जातात, असा आरोप त्यांनी केला होता.
हेही वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I really like and appreciate your blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.