संजय राऊत यांनी आधी सामनाच्या अग्रलेखातून आणि नंतर मीडियाशी बोलताना उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय राजकारणात येण्याचं आवाहन केलं. शरद पवार वगळता देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचं मोठं नेतृत्व नाही. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही पोकळी भरून काढावी. त्यांनी पवारांच्याबरोबरीने राष्ट्रीय राजकारणात यावं. उद्धव ठाकरे यांच्याकडे क्षमता आहे. त्यांनी ज्या परिस्थितीत महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली ती राजकारणातील उलथापलाथच होती, असंही ते म्हणाले.
राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्राचा नेताच असतो. चंद्राबाबू नायडू असोत की ममता बॅनर्जी हे मुख्यमंत्री असतानाही राष्ट्रीय राजकारण करतच होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालावं. आगामी काळात राष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याने सर्वांनी पवारांच्या नेतृत्वात एकत्र यावं, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
अजितदादा ऑइलपाणी देतात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरून शुभेच्छा देताना वापरलेल्या फोटोवरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी अजित पवारांचा तो फोटो पाहिला. त्यांचा स्टेअरिंगचा अनुभव चांगला आहे. स्टेअरिंग त्यांच्या हाती असलं तरी गाड्या आम्हीच पुरवत असतो, असं सांगतानाच अजित पवार ही महाविकास आघाडीची गाडी उत्तमपणे पुढे नेत आहेत. तेही या गाडीला ऑइलपाणी पुरवत असतात, असं राऊत म्हणाले.
मोदी-शहा कुठे फिरत आहेत?
राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री फिरत नाहीत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे फिरत आहेत ते तरी दाखवा?, असं आव्हान देतानाच सरकारने काही नियम केला आहे. त्यामुळे ती फिरत नाहीत. कार्यालयात बसून प्रशासनाकडून काम करून घेत असतात, असं सांगतानाच मोदी-शहा का फिरत नाहीत, हे पाटील यांनी केंद्रात जाऊन आजच विचारायला हवं, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात ११ कोटी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येकाला वाटतं मीच मुख्यमंत्री झालोय. उद्या पाटील यांनाही तेच मुख्यमंत्री झाल्याचं वाटू शकतं. वाटलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. त्यांना तसं वाटेत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू, असंही ते म्हणाले. मी भविष्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत घेणार आहे. त्याबाबत पाटील यांचं काय म्हणणं आहे? असा चिमटाही त्यांनी काढला. मुख्यमंत्र्यांना मी चंद्रकांतदादांच्या मनातीलच प्रश्न विचारलेत, असा टोलाही त्यांनी हाणला. निमंत्रण आल्यानंतर उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनाला जाणार असल्याचंही त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं.
मोदी आणि ठाकरे यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगळे असतात. राजकारणात परिस्थिती निर्णय घेण्यास भाग पाडत असते. राजकारणात कोणीही व्यक्तिगत शत्रूत्व घेऊन काम करू नये, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मोदींनी शुभेच्छा दिल्या हा त्या संस्कृतीचा भाग आहे, असंही ते म्हणाले. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे मुख्यमंत्री असा उल्लेख केला नाही, त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मीही कधीकधी उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे मुख्यमंत्री लावत नसतो. त्यात काही वावगं नाही. उद्धव ठाकरे प्रिय आहेत म्हणून नाही लिहित. फडणवीस यांनाही उद्धव ठाकरे प्रिय आहेत म्हणून त्यांनी नसेल लिहलं, असं ते म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I really like and appreciate your blog post.
I like the valuable information you provide in your articles.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.