मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती व पंतप्रधान यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उद्धव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव यांनीही या दोघांच्याही ट्वीटला तात्काळ प्रतिसाद देत त्यांचे आभार मानले आहेत.

‘आपल्या निरोगी दीर्घायुष्य लाभो’, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांबद्दल उद्धव यांनी मोदींना मनापासून धन्यवाद दिले आहेत. ‘आपलं मार्गदर्शन आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. याच्या जोरावर पुढील काळात महाराष्ट्र देशाच्या विकासात अधिकाधिक योगदान देत राहील, असा विश्वास उद्धव यांनी मोदींच्या ट्वीटला उत्तर देताना व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फोन करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. तसंच, राज्यातील कोविड १९ च्या परिस्थितीची माहितीही घेतली. उद्धव ठाकरे यांनीही त्यांचेही आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. मात्र, करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शिवसैनिक व हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालय किंवा मातोश्री निवासस्थानी येऊ नये. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान,
यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्यावा, असं आवाहन उद्धव यांनी केलं आहे. जनतेच्या शुभेच्छा मी करोना योद्ध्यांना समर्पित करतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री आहेत. याआधी मनोहर जोशी आणि नारायण राणे यांनी हे पद भूषवले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here