बुलढाणाः शेगाव शहरातील मटकरी गल्लीतील रहिवासी आनंद पालडीवाल यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कडी कोंडा तोंडून १५ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत एक कोटीची घरफोडी केली होती. त्यामधील पहिला आरोपी मेहकर तालुक्यातील सोनाटीबोरी येथून १९ जानेवारी तर आणखी दोन आरोपी पिंपरी देशमुख तालुका व जिल्हा परभणी येथून अटक करण्यात आले आहेत.शेगावाच्या इतिहासात एक कोटींचा दरोडा हा सर्वात मोठा होता. पोलीस प्रशासनाने देखील आपले तपास चक्रे गतिमान केल्याने या चोरीत पाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणावरून आतापर्यंत एकूण ‘तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पहिला आरोपी मेहकर तालुक्यातील सोनाटीबोरी – येथून अटक करण्यात आला असून त्याचे नाव वैभव मानवतकर असे आहे. तर २० जानेवारी रोजी मुंजा तुकाराम कहाते (२०), प्रीतम अमृतराव देशमुख (२९) असे आहेत. वाचाः दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता शेगावात पालडीवाल यांच्या घरात झालेल्या एक कोटीच्या घरफोडीत सीसीटीव्ही मध्ये दोनच आरोपी दिसून आले असले तरीही या घरफोडीत अधिक आरोपी असण्याची शक्यता आहे.पोलिसांनी आधी एक व त्यानंतर दोन असे एकूण तीन आरोपी आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केले असून या घरफोडीत आणखी आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.वाचाः पालडीवाल कुटुंब आईच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी गेल्याची संधी साधत १४०० ग्रॅम सोन्याचे दागिने, २ किलो चांदी व २५ लाख नगदी असा ऐकून १ कोटींच्या आसपास ऐवज चोरट्यानी लंपास केला होता. एक कोटीची घरफोडी झालेली शेगावची घटना जिल्ह्यातील सर्वात मोठी घटना होती. सीसीटीव्हीमध्ये आरोपीचे फुटेज आल्याने व तांत्रिक महितीच्या आधारे पोलिसांनी कसून तपास केल्याने आरोपींना अटक करण्यात येत आहेत. सदर घरफोडीमध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.वाचाः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here