नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या मखमलाबाद पेठरोड लिंक रोडवरील पाटालगत शनिवारी (दि. २१) एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटणे देखील पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या खुनाचा उलगडा पंचवटी पोलिसांनी केला असून २ अल्पवयीन मुलांकडून हा खून केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ऋषिकेश दिनकर भालेराव (वय १९, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर) या तरुणाचा खून झाला असून शुल्लक कारणावरून दोन अल्पवयीन मुलांनी हा खून केला आहे. ऋषिकेश हा कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता. त्याला विविध प्रकारचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी, ऋषिकेश याने सातपूरकडे कामानिमित्त आलेल्या दोन अनोळखी अल्पवयीन मुलांकडून हमालवाडीकडे पाटाजवळ सोड असे सांगून लिफ्ट मागितली.

धक्कादायक VIDEO! एकविरा देवी मंदिर परिसरात लेडी डॉनचा हैदोस, ओट्यावर बसून दारू पितात अन्…
या मुलांनी ऋषिकेशला लिफ्ट दिली. त्यावेळी ऋषिकेश हा दारू पिलेला होता. त्याने अल्पवयीन मुलांकडे दारूसाठी पैसे मागितले. मुलांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. दोघा अल्पवयीन मुलांपैकी एकाची गच्ची पकडून शिवीगाळ केल्याने याचा राग त्यांना आला आणि त्यांनी ऋषिकेश भालेराव याचे दगडाने तोंड ठेचून त्याला जीवे ठार मारले.

दरम्यान, पंचवटीतील हमालवाडी पाटा लगत शनिवारी ऋषिकेशचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. याबाबत पंचवटी पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. ऋषिकेशचे दगडाने तोंड ठेचल्यामुळे त्याची ओळख पटवणेदेखील कठीण झाले होते. या खुनाचा उलगडा करणे पंचवटी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. पोलिसांना मानवी कौशल्याच्या आधारे मिळालेल्या गोपनीय माहितीचा धागा पकडून कसोशीने तपास करून याबाबत विचारपूस करून ही हत्या दोन अल्पवयीन बालकांनी केल्याचे निष्पन्न झालं आहे.

Mumbai Crime: विकृतीचा कळस! आधी अंगाला चावला नंतर…; पतीने जे केलं ते ऐकून पोलिसही हादरले

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here