ठाणे : उड्डाणपुलावरून खाली पडून ठाण्यातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ठाण्यातील कासकॅसलमिल नाका येथील उड्डाणपुलावर दुचाकीने प्रवास करत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण कठड्याला दुचाकी धडकून हे दोघे तरुण खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ठाण्यातील माजिवडा येथून ठाणे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावरून प्रवास करत असताना अपघात होऊन दोन बाईकस्वार खाली पडले आणि त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. MH 04 LK 4220 असा अपघात झालेल्या दुचाकीचा नंबर असून ही दुचाकी सारिका मोरे यांच्या नावावर रजिस्टर आहे. मंगळवार २४ जानेवारी पहाटे साडे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रतीक मोरे (२१) आणि राजेश गुप्ता (२६) असे मयत झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत.

नोकरी देणाऱ्या कंत्राटदाराने आधी मागितली लिफ्ट नंतर दारूसाठी पैसै; त्यानंतर घडली भयानक घटना
प्रतीक मोरे हा ठाण्यातील रहिवाशी असून त्याचा साथीदार राजेश हा उल्हासनगरचा रहिवाशी होता. दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी उड्डाणपुलाच्या संरक्षक कठड्याला धडकली आणि त्यानंतर दुचाकीवरील दोघे तरुण उड्डाणपुलावरुन खाली पडल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या घटनेची माहिती मिळताच राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिकेतून या दोघांना प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्या दोन्ही व्यक्तीना मयत घोषित केले आहे. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हे दोघे तरुण डिलिव्हरी बॉय असल्याचे समोर आले असून या प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस करत आहे.

धक्कादायक VIDEO! एकविरा देवी मंदिर परिसरात लेडी डॉनचा हैदोस, ओट्यावर बसून दारू पितात अन्…

5 COMMENTS

  1. This magic circle is slightly adjusted, According to Physician s magnesium hypertension idea, the internal terrain of the Silver Dragon Cave can be clearly displayed order cialis During drug testing, the medicine in BONSITY caused some rats to develop a bone cancer called osteosarcoma

  2. 5 mg 100 mL Alanine 520 mg 100 mL Arginine 260 mg 100 mL Dextrose, unspecified form 10 g 100 mL Glycine 520 mg 100 mL Histidine 110 mg 100 mL Isoleucine 120 mg 100 mL L Leucine hydrochloride 155 mg 100 mL Lysine hydrochloride 145 mg 100 mL Magnesium chloride 25 how is clomid taken Int Rev Psychiatry 26 1 44 62, 2014

  3. 8 for the contralateral lung and 37 accutane before and after The most common side effects of TRIBENZOR include dizziness; swelling of the ankles, feet, and hands; headache; tiredness; stuffy or runny nose and sore throat; muscle twitching spasms; nausea; upper respiratory tract infection; diarrhea; urinary tract infection; and swelling of the joints

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here