मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. करोनाच्या संकटामुळं वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सकाळपासून राजकीय क्षेत्रातील अनेक लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धवजी यांना खूपखूप शुभेच्छा. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो!, अशा शुभेच्छा अजितदादांनी दिल्या आहेत. सोबत त्यांनी एक फोटोही ट्वीट केला आहे. हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.
वाचा विशेष लेख:
बारामतीच्या कृषी प्रदर्शनातील हा फोटो आहे. उद्धव ठाकरे व अजित पवार हे एका गाडीत बसून कृषी प्रदर्शन पाहत आहेत. गाडीचं स्टिअरिंग अजित पवारांच्या हातात आहे, असा तो फोटो आहे. त्यामुळं सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे.
संसदीय कामकाजाचा कुठलाही अनुभव नसताना उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना घेऊन त्यांना सरकार चालवावं लागत आहे. त्यामुळं हे सरकार नेमकं कोण चालवतंय अशी चर्चा सातत्यानं होत असते. उद्धव ठाकरे नामधारी आहेत, अजित पवार हेच सरकार चालवताहेत, काही ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर काही ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री असं चित्र आहे, अशी टीका विरोधकांकडून सातत्यानं होत असते. ‘सामना’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतून उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे ही चर्चा खोडून काढली होती. ‘राज्यात तीन चाकी किंवा रिक्षा सरकार असलं तरी त्याचं स्टिअरिंग माझ्या हातात आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. अजितदादांनी आज ट्वीट केलेला फोटो त्याच वक्तव्याशी जोडून पाहिला जात आहे. पवारांच्या ट्वीटवर त्याविषयी अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.77194552 77194552 77194552
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.