Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये (Aurangabad) धक्कादायक घटना समोर आली असून, औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागातील (CID) शिपायाने रेल्वे स्थानकावर सचखंड एक्स्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. 23 जानेवारीला दुपारी ही दुर्दैवी घटना घडली असून, या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल सोनवणे (वय 42 वर्षे, रा. एन-6, सिडको) असे मृताचे नाव आहे. तर लोहमार्ग पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात पाठवले होते. 

अधिक माहितीनुसार, सोनवणे हे 2018 पासून सीआयडी कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. ते अनुकंपा धर्तीवर नोकरीला लागले होते. त्यांची मुलगी अभ्यासात हुशार आहे. गतवर्षीच तिचा नर्सिंगच्या शिक्षणासाठी शासकीय कोट्यातून मुंबई येथे नंबर लागला आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी आर्थिक मदतही केली होती. दरम्यान, 23 जानेवारीला सकाळी सीआयडी कार्यालयात चाललो, असे सांगून ते घरातून बाहेर पडले. मात्र, ते कार्यालयात न जाता ते रेल्वे स्थानकावर गेले. दुपारी प्लॅटफॉर्म क्र. 2 वर आलेली सचखंड एक्स्प्रेस रेल्वे पुढील प्रवासासाठी निघताच सोनवणे पलीकडील बाजूने धावत आले आणि रेल्वेसमोर उडी घेतली. ज्यात काही क्षणांत रेल्वे त्यांच्या अंगावरून गेली. हा प्रकार लोहमार्ग पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मृतदेह घाटीत नेला.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट! 

सोनवणे हे 2018 पासून सीआयडी कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते घरून कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. तर सीआयडी कार्यालयात चाललो असे त्यांनी घरी कळवले होते. मात्र असे असताना त्यांनी रल्वे स्थानकावर जाऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच त्यांनी अशाप्रकारे टोकाचे पाऊल का उचलेले याचे कारण अजूनही अस्पष्टच आहे. तर पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

पोलीस दलात खळबळ! 

अनिल सोनवणे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर कर्मचारी आणिअधिकाऱ्यांना देखील धक्का बसला आहे. सर्व काही सुरळीत सुरु असताना अनिल सोनवणे यांनी रेल्वे समोर आत्महत्या करण्याचा टोकाचा पाऊल का? उचलले याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान आता सर्व घटनेचा खुलास पोलिसांच्या तपासातच स्पष्ट होणार आहे. 

news reels New Reels

इतर महत्वाच्या बातम्या: 

पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय आला; मित्राला आधी दारू पाजली मग कायमचा काटा काढला

 

4 COMMENTS

  1. Purpose A randomized trial was performed to assess the efficacy of maintaining tamoxifen therapy beyond 5 years in women with axillary lymph node positive breast cancer who had been treated with surgery followed by 1 year of chemotherapy and 5 years of tamoxifen nolvadex price

  2. Next, Section 355 j B iv defines a court decision as an action described in clause iii nolvadex gynecomastia Kober compiled statistics on each character, tabulating its incidence at the beginnings of words, the middles, the ends, in combination with every other character and much else

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here