Authored by अभिजित दराडे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Jan 2023, 10:43 am

Maharashtra Politics | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शिंदे गटाची ताकद वाढत आहे. सुरुवातीला ठाकरे गटाला लक्ष्य केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा इतर राजकीय पक्षांकडे वळवला आहे. पुण्यात शिंदे गटाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा नेता गळाला लावला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

NCP youth wing Pune
राष्ट्रवादीच्या तरुण नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

हायलाइट्स:

  • गणेश सातव हे मूळचे वाघोली येथील आहेत
  • युवांचा तगडा संपर्क हे सातव यांचं बलस्थान आहे
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातून तर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट, मनसे यांच्यातील पदाधिकारी आधीच गळाला लावलेले असताना आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट राष्ट्रवादीलाच दणका देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसला पुण्यात मोठे खिंडार पाडले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष गणेश सातव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. २२ जानेवारी रोजी ठाणे येथील हॉटेल टीप टॉप या ठिकाणी हा प्रवेश झाला आहे. गणेश सातव हे मूळचे वाघोली येथील आहेत. युवांचा तगडा संपर्क हे सातव यांचं बलस्थान आहे. अशात येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली महापालिका निवडणूक आणि त्यात पुणे महापालिकेत नवीनच समाविष्ट झालेले वाघोली गाव या सगळ्यात एका युवा चेहऱ्याने पक्ष सोडल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी हे प्रवेश घडवून आणले असल्याने पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचा उघड संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे पोहचवण्याचे काम करणार असून पुणे जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी जीवाचं रान करणार असल्याची प्रतिक्रिया गणेश सातव यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’शी बोलताना दिली आहे. गेल्यावर्षीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश सातव यांची पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती.
Pune Bypoll: कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक जिंकण्याची जबाबदारी अजित पवारांवर? शरद पवारांचं महत्त्वपूर्ण भाष्य
दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटाने परभणीत चार राजकीय पक्षांना खिंडार पाडले होते. पंचायत समितीच्या सभापतीसह चाळीस सरपंच, उपसरपंच यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. विशेषत: गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणावर शिंदे गटाची वाट धरली होती. परभणी तालुक्यातील ठाकरे गटाचे १६, राष्ट्रवादी काँग्रेसचे १५, काँग्रेस ४ , अपक्ष ४ , वंचित बहुजन आघाडी एक अशा एकूण ४० जणांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

2 COMMENTS

  1. We carefully curate the webГў s most essential stories and bring you original must reads from our talented contributors doxycycline and birth control There have been several hypotheses and increasing studies in the last few years relating the incidence of Blastocystis infections with the prevalence of irritable bowel syndrome IBS in patients

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here