अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील Vaxartने घोषणा केली की, ज्या लशीवर कंपनी काम करत होती, त्या लशीचा समावेश अमेरिकन सरकारने ‘ऑपरेशन वार्प स्पीड’मध्ये केला आहे. ही मोहीम करोनाशी लढण्यासाठी लस आणि औषधे विकसित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या नंतर Vaxartच्या शेअर्सनी गगनभरारी घेतली. या कंपनीत ज्यांनी गुंतवणूक केली होती, त्यांना मोठा फायदा झाला. अनेकांनी किंमत वाढल्यानंतर आपले शेअर्स विकले.
वाचा:
कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी अनेकांनी चढ्या किंमतीवर शेअर्सची खरेदी केली आहे. करोनाची लस विकसित झाल्यानंतर बाजारात विक्रीवर आल्यावर या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक वरिष्ठ अधिकारी करोनाच्या संकटाचे रुपांतर संधीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. जवळपास ११ लहान कंपन्यांनी फक्त घोषणा करूनच जवळपास एक अब्ज डॉलरहून अधिक कमाई केली आहे.
वाचा:
वाचा:
काही प्रकरणात कंपनीतील शेड्युल्ड कॉम्पसेशन किंवा ऑटोमेटिक स्टॉक ट्रेड्स पैसे कमावत आहेत. मात्र, काहीजण वेगळ्या प्रकारे गुंतवणूक करत आहेत. काही कंपन्यांनी लशीबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्याआधी स्टॉकमध्ये पर्याय दिले होते. सकारात्मक बातम्यांसाठीही काहींनी प्रयत्न केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन सरकारकडून आता काही कंपन्यांची चौकशी सुरू झाल्याचे वृत्त आहे. या कंपन्यांनी ऑपरेशन वार्प स्पीडचा वापर आपल्या मार्केटिंगसाठी करून मोठ्या प्रमाणावर कमाई केली असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे.
वाचा:
मागील पाच-सहा महिन्यात काही कंपन्यांनी मोठी कमाई केली असल्याचे समोर आले आहे. न्यूयॉर्कमधील एका बायोटेक कंपनी रेजेनेरॉनच्या शेअर्स दरात फेब्रुवारीपासून ८० टक्के वाढ झाली आहे. त्यावेळी कंपनीने आरोग्य विभागासोबत आपण कोविड-१९वर औषध विकसित करत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर कंपनीचे संचालक आणि एक्झिक्युटिव्स यांनी जवळपास ७०० दशलक्ष किंमतीची शेअर्स विक्री केली आहे. त्याशिवाय करोना लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मॉडर्ना कंपनीची स्टॉक किंमतही तीनपटीने वाढली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत २४८ दशलक्ष डॉलरची शेअर्स विक्री करण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.