Nanded News: नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) कंधार तालुक्यातील शेल्हाळी येथील यात्रेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  रेड्यांच्या टकरीच्या कार्यक्रमात चक्क माणसांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत अनेकजण गंभीर जखमी देखील झाले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शेल्हाळी गावात दरवर्षीप्रमाणे महाकालीची यात्रा भरवण्यात आली होती. दरम्यान यावेळी आयोजकांनी यात्रा आणि इतर निमित्ताने रेड्यांच्या टकरीचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे यंदाही रेड्यांच्या टकरीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान दोन रेड्यांमध्ये तुंबळ युद्ध पेटले. दोन्ही रेड्यांमध्ये जोरदार युद्ध सुरु असतानाच, यावेळी दोन्ही गटांकडून रेड्यांना चिथविण्यात येत होते. तर ही टक्कर संपत आली, तोच दोन्ही गटांतील माणसांमध्ये वाद सुरु झाला. एवढच नाही तर दोन्ही गटातील माणसे एकमेकांवर तुटून पडली. लाठ्या-काठ्यांनी मारहाणीस सुरुवात झाली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या मारहाणीत अनेकांना जबर दुखापत झाली आहे. तर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बंदी असताना देखील भरली रेड्यांची टकरी

राज्यात रेड्यांच्या टकरीवर बंदी घालण्यात आली आहे, परंतु त्यानंतरही यात्रा आणि इतर निमित्ताने रेड्यांच्या टकरीचे आयोजन करण्यात येते. अशीच काही रेड्यांच्या टकरीचं आयोजन नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील शेल्हाळी येथील यात्रेत करण्यात आली होती. मात्र आता याठिकाणी झालेल्या वादाचा व्हिडिओ समोर आल्याने बेकायदेशीर भरवण्यात आलेल्या रेड्यांच्या टकरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तर याप्रकरणी कायदेशीर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. तर प्राण्यांच्या जिवावर बेतणाऱ्या अशा खेळाबद्दल संबंधित यंत्रणा गाफिल राहिल्याचा देखील यातून स्पष्ट होत आहे. 

व्हिडिओ व्हायरल! 

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील शेल्हाळी येथील यात्रेदरम्यान रेड्यांच्या टकरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन गटात वाद झाला आणि वादाचे रूंपातर हाणामारीत झाले. पाहता-पाहता दोन्ही गटातील लोकांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन एकमेकांना मारहाण सुरु केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यात तुफान हाणामारी होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मारहाणीत अनेकांना जबर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. 

news reels New Reels

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded News: अधिकचा परतावा अन् महागड्या गाड्या भेट देण्याचे आमिष; नांदेडात शेअर मार्केट गुंतवणूक घोटाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here