भुवनेश्वर: ओदिशाच्या खुर्दा जिल्ह्यात एका महिलेनं पतीची हत्या केली. पतीची हत्या करून त्याचा मृतदेह एका ट्रॉली बॅगेत भरण्यात आला. त्यानंतर पत्नीनं ती बॅग जंगलात फेकली. बॅग सापडल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपी पत्नीला अटक केली.

मनोरंजन महापात्राच्या हत्या प्रकरणात त्याची पत्नी मिली दास, तिचा चुलत भाऊ मितू दास आणि त्याचा मित्र विक्रम यांना अचक केल्याचं खुर्दाचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ कटारिया यांनी सांगितलं. रविवारी जिल्हा मुख्यालयापासून ६५ किलोमीटर अंतरावर नचुनी परिसरात असलेल्या हरिपूर जंगलात एक म-तदेह सापडला. त्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.
हजार रुपयांचं खाणं फक्त २००-३०० रुपयांत! झोमॅटोमधला धक्कादायक स्कॅम उघड; CEO म्हणतात…
मूळचा नयागढ जिल्ह्याच्या रंगपूरचा रहिवासी वास्तव्यास असलेला मनोरंजन खुर्दात पत्नीसोबत राहत होता. मिलीच पतीच्या हत्येची मुख्य सुत्रधार असल्याचं पोलिसांना प्राथमिक तपासातून समजलं. पती शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्यानं पत्नीनं त्याच्या हत्येचा कट रचला. मनोरंजनच्या विरोधात ६-७ अजामीनपात्र गुन्हे दाखल आहेत. मनोरंजन अनेकदा दारू पिऊन पत्नीला त्रास द्यायचा. त्यामुळे मिलीनं त्याची हत्या करण्याची योजना आखली.
अक्षयला झोपायला घरी बोलव! नवऱ्याने बायकोला सांगितले; प्रियकर येताच संपवले; २० तुकडे केले
मृतदेह आढळून आलेल्या ट्रॉली बॅगनंच पोलिसांना सर्वात महत्त्वाचा पुरावा दिला. ही बॅग एका स्थानिक बाजारपेठेतील दुकानातून खरेदी करण्यात आली होती. त्या दुकानात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला गती मिळाली. पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले. तिथे क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला. आता पोलिसांना पुढील कारवाई सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here