Pathaan Movie Jalgoan : ‘मे तेरा हायरे, जबरा, होय रे जबरा फॅन हो गया…’ आपल्या आवडत्या हिरो हिरोईनसाठी फॅन्स काय करतील हे सांगणं अवघड आहे. एखाद्या आवडत्या हिरोचा चित्रपट येत असेल अनेक प्रकारे फॅन्स हे चित्रपटाचे प्रोमोशन करत असतात. अशातच किंग खानच्या (Shahrukh Khan) पठाण चिंत्रपटासाठी जळगाव (jalgoan) येथील फॅन्सने अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहे. चक्क पठाण चित्रपटानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

किंग खानचा बहुचर्चित पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही तास शिल्लक असून चित्रपटाचे बेशरम गाणे रिलीज झाल्यापासून वादात आहे. अशातच उद्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनित असलेला पठाण हा चित्रपट रिलीज होणार आहे. तत्पूर्वीच या चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे. बीडच्या एका चाहत्याने चक्क थिएटर बुक केल्याचा समोर आलं होत. आता जळगाव मधील एसआरके युनिव्हर्स या मित्र मंडळाच्या वतीने शाहरुख खान यांच्या आगामी पठाण चित्रपटानिमित्त भव्य रक्तदान (Blood Donation Camp) शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जळगाव शहरातील एस आर के युनिव्हर्स या मित्रमंडळाने शहरातील एम जे कॉलेज जवळ या भव्य रक्तदान शिबिराचा आयोजन केलं होतं. 

 

दरम्यान चित्रपटाच्या आधी पठाण चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले आहे. यात शाहरुख खान सुद्धा मागे नाही. पठाण चित्रपट रिलीज होत असल्याने अनेक फॅन्स सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. तर शाहरुख खान ट्विटर हॅण्डलवरून चाहत्यांशी चॅट करत शुभेच्छा स्वीकारत आहे. सध्या शाहरुख सोशल मीडियावर ‘आस्क एसआरके (Ask SRK) या टॅग सेशन अंतर्गत फॅन्सशी संवाद साधत आहे. त्यानिमित्ताने शाहरुखच्या जळगावमधल्या फॅन्स क्लबनी खास रक्तदान शिबीराचं आयोजन केलंय. अजान या ट्विटर हॅण्डलवरून रक्तदान शिबिराचा फोटो शेअर करण्यात आला असून या ट्विटला खुद्द शाहरुख खानने देखील शुभेच्छा देत प्रतिसाद दिला आहे. 

शाहरुखचा ट्विटरला प्रतिसाद 

जळगाव मधील SRK युनिव्हर्स या शाहरुख खानच्या फॅन क्लबने खास रक्तदान शिबीर आयोजित केलंय. या क्लबने त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. ‘सर आमच्या जळगाव बॉईजने तुमच्यासाठी खास रक्तदान शिबीर आयोजित केलंय. तुम्ही पाहिलं का?’ असं ट्विट करत या फॅन क्लबने शाहरुख खानला ट्विटर वर टॅग केलंय. शाहरुखने सुद्धा या जळगाव फॅन क्लबचा फोटो त्याच्या अकाउंटवर शेयर केलाय. ‘खूप सुंदर भावना.. धन्यवाद’ असं म्हणत शाहरुखने त्याच्या फॅन क्लबचं कौतुक करून त्यांचे आभार मानले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here