Nanded News: मोर्चा, धरणे, उपोषण, आमरण उपोषण हे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या अनुषंगाने अपेक्षित नाहीत. एकप्रकारे या राष्ट्रीय सणांचा अवमान केल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात (Nanded District) लागू असलेली आचारसंहिता, जमावबंदी लक्षात घेता तक्रारदारांनी कोणत्याही प्रकारचे असंविधानिक मार्ग अवलंबिल्यास संबंधितांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नांदेडचे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. तर प्रत्यक्ष कार्यालय प्रमुख व अर्जदार यांची समोरासमोर सुनावणी देखील घेत तक्रारीचा निपटारा केला आहे. 

तक्रारदाराच्या मागण्यांमधील सत्यता पडताळून त्याचा वेळीच निपटारा करण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्राप्त व विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथील उपोषण संदर्भाने आलेले 5 अर्ज जिल्हाधिकारी स्तरावरील 27 अर्ज, नांदेड जिल्ह्यातील आत्मदहन संदर्भाने आलेले 33 अर्ज व नांदेड शहरातील 7 अंदोलनाच्या अर्जाबाबत सुनावणी घेण्यात आली. यासाठी सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी कार्यालयाने पाचारण केले होते. प्रत्यक्ष कार्यालय प्रमुख व अर्जदार यांची समोरासमोर सुनावणी झाल्यामुळे जलदगतीने निपटारा झाला. काही प्रकरणात जर संबंधित प्राधिकरणाबाबत काही तक्रार असल्यास संबंधीत प्राधिकरणाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे अपील सादर केले जाऊ शकते, असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्देशीत केले. 
अन्यथा कठोर कारवाई! 

अन्यथा कठोर कारवाई!

तर जिल्ह्यात सध्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता असून त्याअनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. याचबरोबर सर्व संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, कार्यासन यांनी अर्जदार, तक्रारदार यांच्या समवेत समन्वय साधून प्रकरणे तात्काळ निरसीत करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. मात्र तरीही जिल्ह्यात लागू असलेली आचारसंहिता, जमावबंदी लक्षात घेता तक्रारदारांनी कोणत्याही प्रकारचे असंविधानिक मार्ग अवलंबिल्यास संबंधितांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अभिजीत राऊत यांनी दिला आहे. 

आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या अनुषंगाने अनकेदा तक्रारदार आंदोलन करतात. बऱ्याचदा काही ठिकाणी आत्मदहन करण्यासारखे प्रकार देखील घडतात. त्यामुळे या सर्व घटना लक्षात घेता नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ तक्रार निवारण सभा आयोजित केली होती. यावेळी संबंधित विभागाचे कार्यालय प्रमुख व अर्जदार यांची समोरासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यामुळे तक्रारीचा तत्काळ आणि त्याच ठिकाणी निपटारा होऊ शकला. जिल्हाधिकारी यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून, कौतुक देखील होत आहे. 

news reels New Reels

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad Bench: शिंदे-फडणवीस सरकारला औरंगाबाद खंडपीठाचा दणका, नांदेडच्या 150 कोटींच्या कामांवरील स्थगिती हटवण्याचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here