महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. फडणवीस यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘करोनाच्या लढ्यात राज्यातील रिक्षा सरकार पुरतं अपयशी ठरलंय. पण त्याकडं लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून आमच्यावर सरकार पाडण्याचा आरोप केला जात आहे. रोज तेच तुणतुणं लावलं जातंय. सरकार पाडून दाखवा असं आव्हान दिलं जातंय. स्वत:च मारायचं आणि स्वत:च रडायचं यातला हा प्रकार आहे. पण आम्हाला सरकार पाडण्यात अजिबात रस नाही. आम्ही ते पाडणार नाही. तुम्ही सरकार चालवून दाखवा,’ असं आव्हान फडणवीसांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिलं.
हेही वाचा:
‘हे सरकार अनेक अंतर्विरोधांनी भरलेलं आहे. ते पाडण्याची गरज नाही. एकमेकांच्या तंगड्या तोडायला हे तिन्ही पक्ष सक्षम आहेत. रोजच्या रोज त्यांचं तेच सुरू आहे. त्यातूनच त्यांचं सरकार कोसळेल. त्यानंतर महाराष्ट्राचं भवितव्य आम्ही ठरवू. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळं जनतेसाठी संघर्ष करत राहू. करोनच्या लढ्यातही आम्ही सरकारला सहकार्य केलं आहे. यापुढंही करू. मात्र, सरकारची दिशा योग्य नसेल. लपवाछपवी होत असेल आणि लोकांवर अन्याय होत असेल तर ते समोर आणणं आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही बजावणारच,’ असंही त्यांनी ठणकावलं.
राज्यातील सध्याचं सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे अशा तोऱ्यात काही नेते बोलत असतात. पण हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही. जनतेनं भाजप आणि मित्र पक्षांना निवडून दिलं आहे. हे बेईमानीनं बनलेलं सरकार आहे,’ असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
A big thank you for your article.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.