SIKANDAR SHEIKH : महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari 2023) माती गटातील अंतिम लढतीत पंचाच्या निर्णयानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सिकंदर शेख याची महाराष्ट्रात चर्चा होती. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी त्याला खांद्यावर घेतलं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर बोट ठेवत सिकंदरच्या बाजूने सोशल मीडियात खूप मोठे ट्रोलिंग झालं होतं. कुस्तीवरुन राज्यातील वातावरण तापलं असतानाच सिंकदर शेखचं वक्तव्य चर्चेत आले आहे. पंढरपूरमध्ये बोलताना सिकंदर शेख यानं आपणच जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं सांगत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पराभवावर उत्तर दिले. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर जवळच्या भीमा साखर कारखान्यावर भीमा केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्तानं सिकंदर शेख पंढरपूरमध्ये आला होता. 

या स्पर्धेत मुख्य कुस्ती सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्र अजनाळ यांच्यात होणार आहे. त्यापूर्वीच सिकंदर शेख  याने कुस्ती मैदानाला अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना शेख याने महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मीच महाराष्ट्र केसरी असल्याचं म्हटले. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मी हरलो‌ असलो तरी महाराष्ट्रातातील जनतेला माहिती आहे असं म्हणत त्याने पंचांच्या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली.  यावेळी त्याने  महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मीच महाराष्ट्र केसरी असल्याचं सांगितलं. आज पंजाब केसरी सोबत होणारी लढत रंगतदार होईल असे सांगताना यापूर्वी दोन लढतीत मी त्याचे सोबत जिंकलो आणि हरलोही असल्याचे सांगितले. या कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर कोल्हापूर सांगली या भागातून जवळपास 500 पैलवान आले असून  कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या कुस्त्यांची 9 लाखांची बक्षिसे आणि चांदीच्या गदा दिल्या जाणार आहेत. 

या लक्षवेधी लढतींकडे असणार लक्ष 

भीमा साखर केसरीच्या गदेसाठी महान भारत केसरी माऊली जमदाडे आणि माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख हे दोन मल्ल झुंजणार आहेत. भीमा कामगार केसरीसाठी मुंबई महापौर केसरी गणेश जगताप आणि पैलवान अक्षय शिंदे यांच्यात लढत होणार आहे. भीमा वाहतूक केसरीसाठी यंदाचा उपमहाराष्ट्र केसरी ठरलेला महेंद्र गायकवाड आणि पंजाब येथील गोरा अजनाला यांची झुंज प्रेक्षणीय ठरणार आहे. भीमा सभासद केसरीसाठी नॅशनल गोल्ड मेडलिस्ट अक्षय मंगवडे आणि संतोष जगताप यांच्यात लढत होणार आहे . 

news reels New Reels

Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिंकदर शेखची जोरदार चर्चा

शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) हा महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेचा अंतिम विजेता ठरला. पण सर्वत्र पैलवान सिकंदर शेखची याचीच जोरदार चर्चा रंगली होती. सेमीफायनलमध्ये त्याच्यावर अन्याय झाल्याचे सांगत चाहुबाजूने त्याच्या पाठीशी चाहते उभे ठाकले होते. उपकेसरी महेंद्र गायकवाडकडून सिकंदरला पराभव स्वीकारावा लागला होता. पण या पराभवाचे शल्य असल्याचं सिकंदरने म्हटलं होते. अन्याय झाल्याचंही त्याने अप्रत्यक्षरित्या सांगितलं होतं. मात्र, कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेन, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here