मित्राकडून प्रेरणा घेऊन यंत्राचा लावला शोध
ओनम सिंग हा मिर्झापूर जिल्ह्यातील गुरु नानक इंटर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीचा विद्यार्थी आहे. या ओनम सिंगने शेतकऱ्यांसाठी खास भाजीपाला वॉशिंग मशीन विकसित केले आहे. या मशिनद्वारे पाण्याची बचत करून भाजीपाला कमी वेळात धुता येतो. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही ओनम सिंग यांना त्यांच्या कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता. यानंतर प्रतिष्ठित आयआयएम अहमदाबाद देखील या कामाची दखल घेत ओनम सिंगला पुरस्कार देणार आहे. ओनम सिंग याला हे मशीन बनवण्याची प्रेरणा एका मित्राकडून मिळाली. त्यानंतर परिश्रम घेत त्याने एक खास प्रकारची मशीन बनवली आहे.
क्लिक करा आणि वाचा- दावोस दौरा फसवणूक; खर्चावर सवाल करत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा
खर्च आला १ हजार रुपये
विद्यार्थी ओनम सिंगने माहिती देताना सांगितले की, एकदा शाळेत जात असताना काही लोक तलावाच्या काठावर भाजी धूत होते. त्याचवेळी जामुन्हिया येथील एका मित्राने सांगितले की, शेतकऱ्यांना मुळा आणि इतर भाज्या धुण्यास खूप त्रास होतो. त्यानंतर ओनमने सुमारे दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर सुमारे एक हजार रुपये खर्चून भाजीपाला धुण्याचे यंत्र तयार केले. यामध्ये बादली, मोटार पंप, वायर, प्लॅस्टिकची टोपली, पाईप व नळ यांचा वापर करण्यात आला आहे. आता हे मशीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी बीएचयूच्या कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा केली जात आहे. त्यांच्या मदतीने या मशीनमध्ये आणखी सुधारणा केली जाणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- नांदेड हादरले! देगलूरमध्ये मोठा दरोडा; वृद्ध महिलेला संपवलं, साडेबारा तोळे सोने, ७० तोळे वाळे लुटले

मशीनसह ओनम सिंग
मुलाच्या यशाने आई-वडीलही खूश
विद्यार्थी ओनम सिंगच्या यशानंतर त्याचे पालकही आनंदी आहेत. ओनमचे वडील व्यवसायाने इंजिनिअर आहेत. त्यांचे कुटुंब कुशीनगर जिल्ह्यातील लाला गुखलियाचे मूळ रहिवासी आहेत. ते मिर्झापूर जिल्ह्यातील भरुहाना हा भाड्याच्या घरात राहतात आणि एका खासगी कंपनीत काम करतात. ओनमची आई पूनम सिंग म्हणाली की, तिच्या हुशार मुलाच्या यशामुळे तिचा आनंद चौपट झाला आहे. ओनम आधीच अभ्यासात अव्वल आहे. मुलाने अशाच प्रकारे पुढे जात राहावे असे तिला वाटते.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईच्या तरुणीने दारूच्या नशेत बंगळुरूहून ऑर्डर केली बिर्याणी, बिल पाहिले आणि खाड्कन नशा उतरली
कलागुणांना मिळत नाही मोठा मंच
डिस्ट्रिक्ट सायन्स क्लबचे समन्वयक सुशील पांडे यांनी सांगितले की, ओनम सिंग नावाच्या विद्यार्थ्याने भाजीपाला वॉशिंग मशीन बनवले आहे. गावातील मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे. त्या लोकांना अशा कार्यक्रमांची माहिती नसते. अशा कार्यक्रमांची माहिती मिळाल्यायनंतर ते जिल्हास्तरावर आणले जातात. अशा परिस्थितीत साधनांच्या कमतरतेमुळे मुलांना मदत होत नाही. विभागातर्फे कार्यक्रम आयोजित केला जातो, परंतु बजेटअभावी उपयोग होत नाही.