ठाण्यातील परिसरातील पादचारी पुलावर ही घटना घडली. या प्रकरणी प्राणीहक्क संघटनेच्या महिला कार्यकर्त्यानं तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा वागळे इस्टेटमधील रोड क्रमांक १६ येथे राहतो. रस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांना काही मुलं रोज खायला देतात. त्याचवेळी पादचारी पुलावर एक व्यक्ती भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांनी लगेच या घटनेची माहिती प्राणीहक्क संघटनेच्या महिला कार्यकर्त्याला दिली. त्यांनी स्थानिक पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र, कार्यकर्त्या महिलेनं याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश संबंधित स्थानिक पोलिसांना दिले, अशी माहिती कार्यकर्त्याने दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. आरोपीनं याआधीही असं कृत्य केल्याची शक्यता आहे. त्याच्या मानसिक आरोग्यही तपासण्यात येत आहे, अशी माहिती मिळते. दुसरीकडे आरोप सिद्ध झाला तर, दोषीला कठोर शिक्षा होऊ शकते, असं बोललं जात आहे.
मध्य प्रदेशातही धक्कादायक घटना
मध्य प्रदेशातही गायीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एका ५५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ५ जुलै रोजी ही घटना घडल्याचे सांगितले जाते. सुंदरनगरमधील डेअरीमध्ये ही व्यक्ती गेली आणि तेथील एका गायीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I like the valuable information you provide in your articles.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.