जयपूर : अखेर राजस्थानातल्या राजकारणात यांचं पारडं जड ठरलंय. राजस्थानचे यांनी राज्य सरकारला बोलावण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा अधिवेशन बोलावलं जाऊ नये, असा आपला कधीच प्रयत्न नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

अशोक गेहलोत यांचं पारडं जड

सोमवारी सकाळीच, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राज्यपालांची ‘तक्रार’ केल्याचं म्हटलं होतं. ‘मी काल पंतप्रधानांशी संवाद साधला आणि राज्यपालांच्या व्यवहाराबद्दल सांगितलं. मी त्यांना त्या पत्रासंबंधीही माहिती दिली जे मी त्यांना सात दिवसांपूर्वी लिहिलं होतं’ असंही यावेळी गेहलोत यांनी म्हटलं होतं.

अशोक गेहलोत यांच्यासाठी दुसरी चांगली बातमी म्हणजे, उच्च न्यायालयानं बसपाच्या सहा आमदारांचा काँग्रेस पक्षात झालेल्या विलयाविरुद्ध भाजपकडून दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावलीय. भाजपच्या यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

तसंच, राज्यपाल त्यांचं काम योग्य पद्धतीनं करत नाहीत असा आरोप करत अॅड. शांतनु पारीक यांनी राज्यपालांना पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करणारी एक याचिका सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली होती.

तसंच सचिन पायलट यांच्या गटातील तीन आमदारही लवकरच माघारी येणार असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलाय.

वाचा :

वाचा :

‘आम्ही आत्ता नाही तर नऊ महिन्यांपूर्वी आमच्या सहा आमदारांचं काँग्रेसमध्ये विलय केला होता. तब्बल नऊ महिन्यानंतर बसपा याची आठवण आली. हे बसपानं भाजपच्या इशाऱ्यावर केलं. त्याच आधारावर बसपानं व्हिप जारी केला होता. आम्हाला नोटीस धाडल्याचं बसपाकडून सांगण्यात येतंय परंतु, अशी कोणतीही नोटीस आम्हाला मिळालेली नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत राहू’ अशी प्रतिक्रिया बसपा आमदार लखन सिंह यांनी व्यक्त केली.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ३१ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन बोलविण्याचा नवा प्रस्ताव राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे पाठविला होता. तसंच काँग्रेसच्या आमदारांनी आणि समर्थकांनी सुरक्षित वावर निश्चित करून प्रत्येक राज्याच्या राजभवनासमोर धरणं द्यावं आणि राजस्थानमधील विधानसभेचं अधिवेशन लवकरात लवकर बोलविण्याची मागणी करावी, असं काँग्रेसनं आवाहन केलं होतं. आपल्याकडे योग्य ते संख्याबळ असून विधानसभा अधिवशनात आपण बहुमत चाचणीसाठी तयार असल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आधीच केलाय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here