या पुस्तकात माईक पोम्पेओ यांनी २०१९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध झाले असते, असे म्हटले आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांवर अणुबॉम्ब टाकला असता की, याचे उत्तर मला नेमकेपणाने देता येणार नाही. पण दोन्ही देश अणुयुद्धाच्या अगदी जवळ आले होते, असे पोम्पेओ यांनी सांगितले. २०१९ मध्ये अमेरिका-उत्तर कोरिया परिषदेसाठी मी हनोई येथे असताना हा प्रसंग घडला होता. २७ आणि २८ फेब्रुवारीच्या दरम्यान भारतीय वायूदलाने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी एअर स्ट्राईक केला होता. हनोई येथे असताना मला याबद्दल माहिती होती. यानंतर अमेरिकन संरक्षण मंत्रालायचे अधिकारी परिस्थिती चिघळू नये यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या सातत्याने संपर्कात होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे २०१९ मध्ये जग अणुयुद्धाच्या आगीत झोकले गेले असते. अणुयद्ध झाले असते किंवा नाही, हे मी अचूकपणे सांगू शकणार नाही, पण अणुयुद्ध अगदी जवळ येऊन ठेपले होते, असे माईक पोम्पेओ यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
सुषमा स्वराज काय म्हणाल्या होत्या?
भारतीय वायूदलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या प्रशिक्षण तळावर बॉम्बसचा मारा केला होता. या हल्ल्यात बालाकोटचा हा परिसर पूर्णपणे बेचिराख झाला होता. त्यावेळी मी हनोईत होता. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर मी भारताच्या तत्कालीन संरक्षणमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधला. बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तान अणुहल्ल्याची तयारी करत असल्याचे त्यांनी मला सांगितले. तसा हल्ला झाल्यास भारत त्याला आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर देईल, असेही मला सांगण्यात आले. त्यावर मी सुषमा स्वराज यांना,’तुम्ही काहीही करु नका, हे सर्व नियंत्रणात आण्यासाठी मला काही वेळ द्या’, असे म्हटल्याचे माईक पोम्पेओ यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
अमेरिकन संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना फोन केला
सुषमा स्वराज यांच्याशी बोलणे झाल्यानंतर माईक पोम्पेओ यांनी तात्काळ अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याकडे गेलो. ते माझ्यासोबत हनोई येथील हॉटेलमध्ये होते. त्याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या गुप्त संदेशवहन यंत्रणेद्वारे आम्ही पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कामर जावेद यांच्याशी संपर्क साधला. भारताकडून मला देण्यात आलेल्या संदेशाबद्दल मी त्यांना सांगितले. तेव्हा लष्करप्रमुख जनरल कामर जावेद यांनी पाकिस्तान अणुहल्ला करणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले. परंतु, त्यांनाही भारत अणुयुद्धाच्या तयारीला लागल्याची भीती वाटत होती. यानंतर आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील उच्चपदस्थांना दुसऱ्या बाजूकडून तुमच्यावर अणुहल्ला होणार नाही, हे पटवून दिल्याचेही माईक पोम्पेओ यांनी पुस्तकात म्हटले आहे.