हेही वाचा:
ऊस उत्पादक व साखर कारखानादारांचे प्रश्न घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या या भेटीची खिल्ली उडवली होती. ‘साखर घरातच लागते. फडणवीसांना गृहमंत्री म्हणजे आपल्याकडं ‘होम मिनिस्टर’ असलेले आंदेश बांदेकर वाटले असतील. त्यामुळं घरातल्या साखरेचा प्रश्न घेऊन ते शहांना भेटले असतील,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा:
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा फडणवीस यांनी आज खरपूस समाचार घेतला. ‘साखर उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रात एक मंत्रिगट तयार करण्यात आला आहे. त्या मंत्रिगटाचे प्रमुख गृहमंत्री अमित शहा आहेत. त्यांना भेटल्याशिवाय याबाबतचे निर्णयच होत नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे माहीत असू नये,’ असं आश्चर्य फडणवीसांनी व्यक्त केलं. ‘आमच्यानंतर यांनीही साखरेच्या प्रश्नावर केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र पवारांनी पतंप्रधान, कृषिमंत्री किंवा आदेश भावोजी यांना लिहिलेलं नाही. ते पत्र त्यांनी अमित शहा यांनाच लिहिलेलं आहे,’ याची आठवणही त्यांनी दिली. ‘खरंतर हे सगळं करण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आहे. राज्यातील इतका मोठा साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी मांडायला हवी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ती मांडली. आपल्या मुख्यमंत्र्यांनी ते केलं नाही, ते आम्ही केलं. पण आमची स्तुती करण्याऐवजी ते थट्टा करताहेत. मुख्यमंत्री व अनेक वर्षे राज्यसभेचे सदस्य असलेल्या विद्वान संपादकांना एवढंही माहीत नसेल तर ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांचं या राज्यात काय होईल असा प्रश्न पडतो, अशी चिंता फडणवीस यांनी व्यक्त केली.
हेही वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I really like and appreciate your blog post.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.