मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं शाळेतल्या शिक्षकांना नववी शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला एवढ्या भयंकर पद्धतीने मारहाण केली की त्याचा चक्क या मारहाणीमध्ये दात तुटला आहे. परवानगीशिवाय पाणी प्यायलाने शिक्षकांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्येही संतापाचं वातावरण आहे.

खाजगी शाळेतील शिक्षकाचा हा नाही निर्दयी चेहरा समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे. या मारहाणीमध्ये जखमी झालेला विद्यार्थ्याने हा प्रकार त्यांच्या पालकांना सांगितला आणि त्यानंतर या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. जखमी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून खाजगी शाळेमध्ये घडलेल्या या घटनेच्या चौकशीच्या आदेश पोलिसांनी दिले आहेत.

Shraddha Walker Murder: आफताबने श्रद्धाची हत्या का केली? अखेर पोलिसांनी समोर आणलं खरं कारण…
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती.होली ट्रिनिटी असं या शाळेचं नाव असून त्या शाळेमध्ये नववीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्याला पाणी पिण्यासाठी अशाप्रकारे मारलं गेलं. इतकं मारलं गेलं की त्याचा दातही तुटला. यानंतर मुलाने याबाबतची माहिती त्याच्या वडिलांना दिली आणि वडिलांनी तातडीने पावलं उचलत जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. इतक्या बेदम पद्धतीने कोण शिक्षक मारतो? याची तातडीने चौकशी व्हावी अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here