Farmers Agitation :  विविध प्रश्नांवरुन शेतकरी (Farmers) आक्रमक होताना दिसत आहेत. खरीप हंगामात (Kharif season) अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पीक विमा (Pik Vima) अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळं बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत वडवणीमध्ये तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. 

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा 

अतिवृष्टीमुळं खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पीक वाया गेली आहेत.  पिकांच्या नुकसानीचा अद्यापही पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.  यावेळी खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि रोगाराईमुळे शेतकऱ्याचं झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीने करून द्यावी अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी मेहकर परिसरातील शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

बीडमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या किसान सभेचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा

भारतीय किसान सभेच्या वतीनं बीडच्या वडवणीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव देण्यात यावा, त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्यात. पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा अदा करावा, अतिवृष्टीचं नुकसान देण्यात यावं या मागण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघाला होता. या मोर्चामध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते.

अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका 

यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी (Rain) झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक या पावसामुळे वाया गेली आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. तसेच पीक विम्याचा परतावा देखील अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारंवार आवाज उठवला आहे. आंदोलने निवेदन दिली आहेत. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळालेला नाही.

news reels New Reels

महत्त्वाच्या बातम्या:

Swabhimani Shetkari Sanghatana : हिंगोली जिल्ह्यात पीक विमा आंदोलनाला हिंसक वळण, गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here