जयपूर: राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये () तीन मोठी वळणे आली आहेत. बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी काँग्रेसविरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळली गेली आहे. तर दुसरीकडे, राजस्थान हायकोर्टात राज्यपाल (Kalraj Mishtra) यांना हटलण्याची मागणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, () यांच्या गटातील ३ आमदार पुन्हा गहलोत यांच्याकडे येणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. (3 mlas of claim to return to )

राज्यपालांना हटवण्याबाबत याचिका
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारी एक याचिका राजस्थान हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. राज्यपाल कलराज मिश्र हे प्रामाणिक पणे आपल्या पदावरून कर्तव्य निभावत नाहीत, असे याचिकेत म्हटले आहे. अॅडव्होकेट शंतनु पारीख यांनी ही जनहीत याचिका दाखल केली आहे.

पायलट गटाचे ३ आमदार माघारी येणार
सचिन पायलट यांच्या सोबत गेलेल्या १९ आमदारांपैकी ३ आमदार पुन्हा गहलोत गटात परतणा असल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने करण्यात येत आहे. हे तीन आमदार पुढील ४८ तासांमध्ये गहलोत यांच्या सोबत येतील असे रणदीप सुरजेवाला यांनी फेयरमाउंट हॉटेलमध्ये आमदारांना संबोधित करताना म्हटले आहे. दरम्यान, ३ आमदारांच्या परतण्याबाबत अधिकृतपणे काही स्पष्ट झालेले नाही.

वाचा:

मदन दिलावर यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

बहुजन समाज पक्षाचे ७ आमदारांनी काँग्रेसमध्ये दाखल होण्याबाबत दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी काँग्रेसमध्ये दाखल होण्यासंदर्भात बसपच्या ६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या त्यांच्या याचिकेवर कोणतीही कारवाई केलेली नाही, असे माजी मंत्री मदन दिलावर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

वाचा:

अखेर राज्यपालांचा अधिवेशन बोलावण्याचा निर्णय

अधिवेशन बोलावण्याबाबत कोणताही निर्ण न घेणारे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी आज अखेर राज्य सरकारला विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा अधिवेशन बोलावलं जाऊ नये, अशी आपली भूमिका कधीच नव्हती, असेही त्यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here