कोईम्बतूर: तमिळनाडूतील कोईम्बतूर विमानतळावर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बोगस पासपोर्टच्या मदतीनं प्रवास करणाऱ्या एकाला बेड्या ठोकण्यात आल्या. अटक झालेला तरुण बांगलादेशचा रहिवासी आहे. त्यानं बनावट कागदपत्रं तयार केली होती. विमानतळावरील अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. चौकशीदरम्यान त्याला काही प्रश्न विचारण्यात आला. त्यानं दिलेली उत्तरं ऐकून संशय आणखी वाढला.

तरुण भारतीय नसल्याचा शंका अधिकाऱ्यांना आली. त्यानंतर एका अधिकाऱ्यानं त्याला भारताचं राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितलं. मात्र त्याला राष्ट्रगीत गाता आलं नाही. यानंतर पुढच्या तपासाला वेग आला. हा तरुण बांगलादेशी असल्याचं तपासणीतून उघड झालं. २३ जानेवारीला ही घटना घडली. संयुक्त अरब अमिरातमधील शारजाहमधून एक तरुण कोईम्बतूरला आला होता. इमिग्रेशनच्या चौकशीत त्यानं भारतीय पासपोर्ट आणि जन्मदाखला दाखवला. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला.
पॉर्न बघून वृद्ध महिलांना हेरायचा; अत्याचार करून संपवायचा; व्हिडीओमुळेच सायकोचा खेळ खल्लास
अधिकाऱ्यानं तरुणाला राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितलं. मात्र तरुणाला राष्ट्रगीत गाता आलं नाही. तेव्हा अधिकाऱ्यानं पुढील चौकशी सुरू केली. त्यातून तो तरुण बांगलादेशी असल्याचं समजलं. तो भारतात बोगस कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास होता. त्याचं नाव अन्वर हुसेन असून तो २८ वर्षांचा आहे. बांगलादेशमधील मैमेनसिंहचा तो रहिवासी आहे.
मुलाचा अपघाती मृत्यू, पण बापाला संशयानं पछाडलं; ५ भावंडांनी चुलत भावाच्या कुटुंबाला संपवलं
पूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्वर हुसेनविरोधात पिलामेडू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. बोगस सरकारी कागदपत्रं तयार केल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. हुसेननं बोगस कागदपत्रं कुठून आणि कशी तयार केली त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here