लखनऊ: अनेकदा हुंड्यामुळे भर मांडवात तुटल्याच्या अनेक घटना तुम्ही आजवर पाहिल्या असतील. पण, उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथून एक असं प्रकरण समोर आले आहे जिथे एका नवरीने दारात आलेली वरात परत पाठवली आहे. येथे एका तरुणीने मांडवात पाहुणे आणि वऱ्हाड आलेलं असताना लग्नास नकार दिला आहे. पण, यामागील कारण हे अत्यंत कौतुकास्पद आहे. लग्नात वधूच्या भावाने वराला पैसे मोजायला दिले आणि इतेथ सारं गंडलं. वराने अनेकदा प्रयत्न केले मात्र त्याला काही पैसे मोजता येईना. याबाबत जेव्हा तरुणीला माहिती मिळाली, तेव्हा तिने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला. तिने भरमांडवात सांगितले की, ‘मी एका अशिक्षित मुलाशी लग्न करणार नाही’. वधूच्या या निर्णयाने दोन्ही कुटुंबात वाद झाला. त्यानंतर दोन्ही पक्ष थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्षांमध्ये कोणताही व्यवहार होणार नसल्याचं ठरलं. अखेर वऱ्हाड नवरीला सोबत न घेताच परतलं.उत्तर प्रदेशातील दुर्गुपूर गावात राहणाऱ्या एका तरुणीचे लग्न तीन महिन्यांपूर्वी मैनपुरी पोलीस स्टेशन बिछमा येथील बबिना सारा गावातील अमनसोबत निश्चित झाले होते. गेल्या गुरुवारी सायंकाळी अमन वऱ्हाड्यांसह मांडवात पोहोचला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास द्वारचा विधी सुरु झाला. यावेळी वर हा अशिक्षित असल्याचा संशय वधूच्या भावाला आला. त्यामुळे वधूच्या भावाने पंडितजींना २१०० रुपये देत ते वराला मोजायला सांगा असं सांगितले. मात्र, यावेळी वराला पैसे मोजता आले नाहीत. ही बाब वधूच्या भावाने आपल्या कुटुंबियांना दिली. जेव्हा ही बाब वधूपर्यंत पोहोचली तेव्हा तिलाही धक्का बसला. हा संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे मी एका अशिक्षित व्यक्तीशी लग्न करणार नाही, असं ती जाहीर केले. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांत गेलं. वर पक्षाने वधू पक्षाविरोधात तक्रार दिली. यावेळी दोन्ही पक्षात वाद झाला. वधूच्या आईने सांगितलं की मुलगा अशिक्षित आहे, जेव्हाकी माझी मुलगी ही १२ वी पास आहे. पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षाची काही तास चर्चा झाली. दोन्ही पक्षाने लग्नावर झालेल्या खर्चाबाबत चर्चा केली. पण, आता याबाबत कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार होणार नसल्याचं ठरलं आणि हे प्रकरण शांत झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here