सिंधुदुर्ग: मिरॉन नावाचा केवळ अकरा वर्षाचा रशियन मुलगा आई-वडिलांबरोबर भारत फिरण्यासाठी आला. परंतु सध्या तो भ्रमंतीऐवजी सिंधुदुर्गृ मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रमला आहे. भारत-रशियाची कित्येक दशकांपासूनची आहे. मिरॉन याच मैत्रीची प्रचिती देणारा छोटा दूत बनला आहे.

सिंधुदुर्गमधल्या आजगाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सध्या गावातील मुलांबरोबरच एक परदेशी चिमुकला अध्ययन करत आहे. मिरॉन नावाचा ११ वर्षांचा मुलगा ६ महिन्यांसाठी आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून रशियाहून आला. आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून फिरताना आजगावच्या शाळेने मात्र त्याला आकर्षित केले. शाळेत शिकण्याचा हट्ट त्याने धरला. आता गेले महिनाभर मिरॉन येथील मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेत आहे.
एका रीलनं रातोरात स्टार; आयुष्य भरभरून जगणारं ऊस तोड मजूर दाम्पत्य इन्स्टावर सुपरहिट
वर्गातील मित्रांबरोबर मिरॉन खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये रमतो आहे. विशेष म्हणजे मित्रांबरोबर संवाद साधताना त्याला भाषेचा कोणताही अडसर जाणवत नाही. मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहायला, बोलायलादेखील शिकला आहे. येथील भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ यावर तो प्रेम करू लागला आहे. वडापाव त्याचा आवडता पदार्थ झाला आहे. शाळेतली प्रार्थनादेखील त्याने पाठ केली आहे. शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहारसुद्धा तो आवडीने खातो.
पासपोर्ट पाहून तरुणाला एअरपोर्टवर रोखलं; अधिकाऱ्यांना संशय; जन गण म्हणायला लावलं अन् मग…
चार महिन्यानंतर त्याला रशियात परत जावे लागणार आहे. परंतु पुन्हा संधी मिळाली तर मी नक्कीच परत येईन, असा मानस त्याने व्यक्त केला आहे. त्याची भारतीय भाषा शिकण्याची आवड बघून जिल्हा परिषद शाळेत त्याला तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. भारतीय शिक्षण धोरणानुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे आणि याचे पालन ही जिल्हा परिषद शाळा करत आहे. भारतीय समाज जीवनाशी एकरूप झालेला मिरॉन खऱ्या अर्थाने भारत-रशिया मैत्रीचा छोटा दूत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here