भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला आज पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यात ७ मान्यवरांना पद्मविभूषण, ९ मान्यवरांना पद्मभूषण, तर ९१ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यांमध्ये तबलावादक झाकीर हुसैन, एस. एम. कृष्णा, सपाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव (मरणोत्तर) सुमन कल्याणपूर, सुधा मूर्ती, राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर) आणि परशुराम खुणे यांचा समावेश आहे.

 

with zakir husain suman kalyanpur sudha murthy parshuram khune 106 honoranles get padma awards
सुधा मूर्ती, सुमन कल्याणपूर, झाकीर हुसैन, मुलायमसिंह यादव यांना पद्म पुरस्कार
नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला आज पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यात ६ मान्यवरांना पद्मविभूषण, ९ मान्यवरांना पद्मभूषण, तर ९१ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या बरोबरच एकूण १०६ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यांमध्ये तबलावादक झाकीर हुसेन, एस. एम. कृष्णा, सपाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव (मरणोत्तर) सुमन कल्याणपूर, सुधा मूर्ती, राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर) आणि परशुराम खुणे यांचा समावेश आहे.

पद्मविभूषण जाहीर करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये तबलावादक झाकीर हुसैन यांच्यासह बालकृष्ण दोषी, एस. एम. कृष्णा, दिलीप महालनोबीस, श्रीनिवास वर्धन आणि सपाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव( मरणोत्तर) यांचा समावेश आहे. तर एकूण ९ मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात प्रसिद्ध गायिका सुमन कल्यापूर यांच्यासह एस. एल. भायरप्पा, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर, वाणी जयराम, स्वामी चिन्ना जीयार, कपिल कपूर, सुधा मूर्ती आणि कमलेश पटेल यांचा समावेश आहे.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांची नावे

रतन चंद्र कर
हिराबाई लोबी
मुनीश्वर चंदेर दावार
रामकुईवांगबे न्यूमे
व्ही पी अप्पुकुट्टान पोडुवल
सानकुराथ्री चंद्रशेखर
उडीवेल गोपाल आणि मासी साडीयान
तुला राम उपरेती
नेकराम शर्मा
जानूम सिंग सॉय
धनीराम टोटो
बी रामकृष्ण रेड्डी
अजय कुमार मंडावी
रामी माचैह
के सी रूनरेसशांगी
सिसिंगोबर कुरकालंग
मंगला कांती रॉय
मोआ शुबॉंग
मुनीवेंकटप्पा
डोमरसिंग कुंवर
परशुराम कोमाजी खुणे
गुलाम मुहम्मद झळ
भानुभाई चितारा
परेश राठवा
कपिल देव प्रसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here