Nashik: नाशिक सह जिल्ह्यात दर आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होत असताना लाचखोरी थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलूचपत विभागाचे अधिकारी कर्मचारी कसोशीने लाचखोरीळा आळा बसावा यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु लाचखोरी थांबायचं नाव घेत नसताना निफाड तालुक्यात लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे.
नाशिकसह जिल्ह्यातील मागील काही लाचखोरीच्या घटनांचा आढावा घेतला असता निफाड तालुक्यात एका महिन्यात एक नायब तहसीलदार आणि कोतवाल, ग्रामसेवक आणि आज कोतवालास लाच घेतांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाचखोरीचे जाळे शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पसरल्याचे अधोरेखित झाले आहे. निफाडच्या एका गावातील तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या कोतवालाने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.
निफाड तालुक्यातील भरवस येथील कोतवालाला 3 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे. लक्ष्मण फकीरा वैराळ असे लाचखोर कोतवालाचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचे वडिलोपार्जित जमिनीचे खाते वाटप आदेश तहसील कार्यालय, निफाड यांच्याकडून प्राप्त झाले होते. सदर आदेशाप्रमाणे सात बारा उताऱ्यावर नोंद करणे आवश्यक होते. तसेच ही नोंद मंजूर करून देण्याकरिता कोतवाल वैराळ याने अर्जदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. पहिल्या टप्प्यात 3 हजार आणि नंतर 2 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि या सापळ्यात वैराळ हा लाच घेताना पकडले गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन एसीबीद्वारे पुढील कार्यवाही सुरू आहे.
एसीबीकडून आवाहन….
दरम्यान या सापळ्यामध्ये एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, पोलिस नाईक शरद हेंबाडे, चालक संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एसीबीच्यावतीने आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक यांनी केले आहे.
New Reels
संबंधित बातमी:
tadalista vs cialis The study found that incontinence improved in more women taking placebo than those taking HRT
A very awesome blog post. We are really grateful for your blog post. You will find a lot of approaches after visiting your post.
online gambling philippines
I came to this site with the introduction of a friend around me and I was very impressed when I found your writing. I’ll come back often after bookmarking! bitcoincasino
Others produce colors more resistant to fading in light what is doxycycline hyclate used for
JoEllen Welsh, a professor at the State University of New York at Albany, said, Vitamin D is pretty unique in its action in that it does enter the cancer cells and induces them to undergo a cell death process generic propecia no perscription