जयपूर: अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टशी संबंधित पुन्हा एक वाद उभा राहिला आहे. निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी पंतप्रधान कार्यालयाला नोटीस धाडली आहे. निर्वाणी आखाड्याचा सहभाग हा रामजन्मभूमी वादाच्या कायदेशीर लढाईत फारच महत्त्वाचा होता असे आखाड्याने नोटीशीत म्हटले आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये स्थान न मिळाल्याबाबत निर्वाणी आखाड्याने स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. येत्या २ महिन्यामध्ये आपल्या नव्या राम मंदिरात पुजारी म्हणून घेण्याचा निर्णय घेतला जावा अशी मागणी महंत धर्मदास यांनी केली आहे.

जर आपल्या मागणीवर विचार केला गेला नाही, तर पुढे आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत असा इशाराही महंत धर्मदास यांनी दिला आहे. सुप्रीम कोर्टातील कायदेशीर लढाईत निर्वाणी आखाडा देखील सहभागी होता. याच कारणामुळे धर्मदास यांनी राम मंदिराच्या पुजाऱ्याच्या गादीवर आपला दावा ठोकला आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट काय आहे?

अयोध्या जमीन वादावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मंदिर निर्मितीसाठी एक ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेस दिला होता. यानंतर मोदी सरकारने १५ सदस्यीय ट्रस्टची निर्मिती केली. या ट्रस्टचे नाव ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ असे ठेवण्यात आले. राम मंदिराची निर्मिती आणि त्याची सर्व व्यवस्था पाहणे ही ट्रस्टची जबाबदारी आहे.

वाचा:

ट्रस्टमध्ये कोण-कोण आहेत?

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास हे आहेत. तर चंपत राय हे महासचिव आहेत. नृपेंद्र मिश्रा यांची भवन निर्माण समितीचे चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर गोविंददेव गिरी यांना ट्रस्टचे कोषाध्यक्ष बनवण्यात आले आहे. अयोध्या वादात हिंदू पक्षाचे मुख्य वकील असलेले ९२ वर्षीय परासरण हे राम मंदिर ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहेत.

वाचा:
परासरण यांच्या व्यतिरिक्त, एका शंकराचार्यासह पाच सदस्य धर्मगुरू ट्रस्टमध्ये सामील आहेत. याबरोबरच अयोध्येतील पूर्वीच्या शाही परिवारातील राजा विमलेंद्रप्रताप मिश्र, अयोध्येतील होमिओपॅथीचे डॉक्टर अनिल मिश्रा आणि जिल्हाधिकारी यांना ट्रस्टी बनवण्यात आले आहे. ट्रस्टमध्ये निर्मोही आखाड्याला देखील स्थान दिले गेले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here