महान अष्टपैलू कपिल देव, ज्यांनी भारतीय क्रिकेट संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकून दिला, त्यांना सैन्यात मानद पद देण्यात आले आहे. कपिल देव यांना २००८ मध्ये लेफ्टनंट पद देण्यात आले होते. एवढेच नाही तर त्यांना टेरिटोरियल आर्मीचा ब्रँड ॲम्बेसेडरही बनवण्यात आले.

सचिन तेंडुलकर
टीम इंडियासाठी क्रिकेटच्या मैदानावर एकाहून एक सरस कामगिरी करणारा सचिन तेंडुलकर. ज्याने क्रिकेट विश्वात आपलं नाव कोरल आहे. सचिनला २०११ साली भारतीय वायुसेनेमध्ये ग्रुप कॅप्टनची मानद रँक देण्यात आली होती.

महेंद्रसिंग धोनी
टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीचे लहानपणापासून सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. २०११ मध्ये त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आणि त्याला लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी देण्यात आली. क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर धोनी अनेकवेळा लष्करासोबत प्रशिक्षण घेतानाही दिसला आहे.

अभिनव बिंद्रा
ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा अभिनव बिंद्राही लष्कराच्या गणवेशात दिसला आहे. त्यांना २०११ मध्ये लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले होते. २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते.
