मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येची चर्चा थांबायला तयार नाही. सुशांतच्या आत्महत्येमागचं सत्य बाहेर यायला हवं अशी मागणी दिवसेंदिवस जोर पकडू लागल्यानं आता राजकीय नेत्यांनीही याची दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव यांनी आज गृहमंत्री यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली.

हेही वाचा:

पार्थ यांनी अनिल देशमुख यांना एक निवेदन दिलं असून त्याद्वारे आपल्या भावना कळवल्या आहेत. ‘सुशांतसिंहच्या आत्महत्येमुळं देश हळहळला होता. सुशांतचं अकाली जाणं म्हणजे आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या देशभरातील तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेचा मृत्यू आहे. बिहार, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांतून मला ई-मेल, फोन आणि मेसेज येत आहेत. या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली जात आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी सर्वांची भावना आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे. जनभावनेची दखल घेऊन आपण हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) विभागाकडे सोपवावे,’ अशी विनंती पार्थ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र, सीबीआयकडे हे प्रकरण गेल्यास ते न्यायोचित ठरेल. राज्याचं गृहखातं या प्रकरणातील गांभीर्य व तातडी लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेईल,’ अशी अपेक्षाही पार्थ यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:

मागील महिन्यात सुशांतसिंह राजपूतनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानं अचानक हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळं अनेकांना धक्का बसला. बॉलिवूड अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही. त्याच्या आत्महत्येवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुशांत बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी अनेक निर्माते, दिग्दर्शकांची चौकशी सुरू असली तरी सीबीआय चौकशीची मागणीही अद्याप कायम आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here