लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक इमारत कोसळली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतून १४ जणांना वाचवण्यात आलं. यामध्ये सहा वर्षांच्या मुस्तफाचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अब्बास हैदर यांचा मुलगा मुस्तफा दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या वाचला. एका कार्टूनमुळे आपला जीव वाचल्याचं त्यानं सांगितलं.

‘इमारत हलू लागताच मी एका बेडखाली लपलो. एका कार्टूनमध्ये मी ते पाहिलं होतं. भूकंप होत असताना काय करायचं, काय नाही करायचं ते मी कार्टूनमध्ये पाहिलं होतं. इमारत हलत असल्याचं वाटू लागताच मी लगेच एका बेडखाली जाऊन लपलो,’ अशा शब्दांत मुस्तफानं घडलेला प्रकार सांगितला.
मित्रांसोबत लपाछपी खेळत होता मुलगा; ६ दिवसांनी ३२१८ किमी दूर सापडला; ऍम्बुलन्स आणावी लागली
‘मी घाबरलो होतो. पण त्याचवेळी मला डोरेमॉनचा एक एपिसोड आठवला. त्यात नोबिताला भूकंपादरम्यान स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बेडखाली आसरा घेण्यास शिकवण्यात आलं होतं. त्यामुळे इमारत हलत असल्याचं वाटताच मी धावत धावत बेडखाली जाऊन लपलो,’ अशा शब्दांत मुस्तफानं संपूर्ण घटनाक्रम कथन केला.

बेडखाली लपत असताना मुस्तफानं त्याच्या आईला धावताना पाहिलं. यानंतर पाहता पाहता पाच मजली इमारत कोसळली. त्यानंतर मुस्तफाच्या डोळ्यासमोर अंधारी आली. पुढे काय झालं ते मुस्तफाला आठवत नाही. जेव्हा मुस्तफानं डोळे उघडले तेव्हा काही अज्ञात लोक त्याला कुठेतरी घेऊन जात होते. मुस्तफाचे वडील अब्बास दुर्घटनेवेळी घरात नव्हते.
पठाणची १२० तिकिटं काढली, पण तरीही सिनेमा पाहू शकला नाही शाहरुखचा जबरा फॅन; नेमकं कारण काय?
मुस्तफाचे आजोबा आणि काँग्रेस नेते अमीर हैदर दुर्घटनेतून वाचले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुस्तफाची आई उज्मा हैदर आणि आजी बेगम हैदर यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी इमारतीच्या बिल्डरविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३, ३०८, ४२०, १२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अहवाल देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. तपास करून आठवड्याभरात अहवाल देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here