जकार्ता: इंडोनेशियामध्ये चार वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला. दोन दिवसांपासून त्याचा ठावठिकाणा सापडत नव्हता. कुटुंबीय, पोलीस प्रशासन, कोस्टगार्डकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र तरीही तो सापडला नाही. तितक्यात मच्छिमारांना नदीत एक मगर दिसली. तिला पाहून मच्छिमारांना धक्काच बसला. बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह पाठीवर घेऊन मगर बोटीच्या दिशेनं गेली. तिनं पाठीवरील मुलाला बोटीपर्यंत नेलं. हा प्रकार पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला.

दहा फूट लांबीची मगर मुलाला पाठीवर घेऊन पोहत पोहत बोटीच्या दिशेनं आली. मगरीनं मुलाचा मृतदेह पाण्यात पडू दिला नाही. विशेष म्हणजे मगरीनं मृत मुलाला जमिनीवर नव्हे, तर एका बोटीपर्यंत सुरक्षित आणलं. बोटीत असलेल्या दोन मच्छिमारांनी मुलाचा मृतदेह मगरीच्या पाठीवरून बोटीत घेतला. डेली मेलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

मगरीनं मुलाला कोणताही धोका पोहोचवला नाही. मुलाच्या शरीरावर एकही जखम नव्हती. बेपत्ता मुलाचा मृतदेह एक मगर तिच्या पाठीवरून घेऊन येत असल्याची माहिती ईस्ट कालीमंतन सर्च अँड रेस्क्यू एजन्सीच्या सदस्यांना देण्यात आली. ही माहिती ऐकून सदस्यांना धक्काच बसला. ‘बुडालेल्या मुलाचा मृतदेह मगरीनं इतक्या दूरवरून अतिशय सुरक्षितपणे आणला. त्याला जराशीही इजा होऊ दिली नाही, हा प्रकार अविश्वसनीय आहे,’ असं सर्च अँड रेस्क्यू एजन्सीच्या प्रमुखांनी सांगितलं. ही घटना अतिशय आश्चर्यकारक असल्याचं ते म्हणाले.
पासपोर्ट पाहून तरुणाला एअरपोर्टवर रोखलं; अधिकाऱ्यांना संशय; जन गण म्हणायला लावलं अन् मग…
मगर पोहत पोहत बोटीपर्यंत पोहोचली. बोटीमध्ये दोन मच्छिमार होते. त्यांनी मुलाचा मृतदेह बोटीत घेताच मगर पाण्यात निघून गेली, असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. मुलाचा मृतदेह बुडाल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुलगा खेळता खेळता नदीत पडला असावा अशी माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here