लंडन: करोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये लठ्ठपणादेखील महत्त्वाचे कारण ठरत असल्याचे समोर आल्यानंतर ब्रिटन सरकारने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लठ्ठपणास कारणीभूत ठरणाऱ्या जंक फूड्सच्या जाहिरातींवर सरकारने बंदी आणली आहे. दूरचित्रवाणी आणि ऑनलाइन या दोन्ही माध्यमांवर रात्री ९ वाजण्यापूर्वी अधिक मेदयुक्त, मीठ, साखर असलेल्या पदार्थांच्या जाहिराती दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे.

एका संशोधनानुसार, बॉडी मास इंडेक्स २५ हून अधिक असल्यास नागरिकांमध्ये संसर्ग होण्याची अधिक शक्यता असल्याचे समोर आले होते. ब्रिटन सरकार जाहिराती बंदीशिवाय आता साखरयुक्त पदार्थाच्या ‘एकावर एक फ्री’ अशा ऑफरवरही बंदी आणण्याचा विचार करत आहे. त्याशिवाय, दुकान आणि रेस्टोरंट्समध्ये ग्राहकांना अधिक कॅलरी असणाऱ्या पदार्थांची माहिती देण्यात यावी असा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अल्कोहोल युक्त पेयांवरही कॅलरीजची माहिती देण्याची सक्ती कंपन्यांवर केली जाऊ शकते. वजन कमी करणे थोडं कठीण काम असलं तरी काही छोट्या छोट्या बदलातून आपण फिट राहू शकतो असे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले.

वाचा:

वाचा: करोनाच्या संसर्गाला नियंत्रित ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे फूड, रिटेल, जाहिरात आणि मीडिया क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच आता सरकारकडून निर्बंध लागू करण्यात येणार असल्यामुळे या क्षेत्रांना अधिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याकडे सरकारचे लक्ष नसल्याचा आरोप होत असताना सरकारला आरोप देण्याची ही मोठी संधी असल्याची चर्चा आहे.

वाचा:

वाचा:

करोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचे एक कारण लठ्ठपणादेखील सांगण्यात येतो. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील करोनाशी दोन हात करून मृत्यूंशी झुंज दिली आहे. त्यामुळे त्यांनी या मुद्यावर गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये दोन-तृतीयांश ब्रिटीश वयस्क नागरिक सामान्य वजनाहून अधिक वजनाचे आहेत. त्याशिवाय प्राथमिक शिक्षण सोडताना तीनपैकी एक विद्यार्थी लठ्ठ होत असल्याचे समोर आले आहे.अधिक वजनामुळे करोनाशी दोन हात करणे आणखी आव्हानात्मक होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच आता ब्रिटन सरकारने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here