सूरत: गुजरातच्या सूरतमध्ये एका महिलेनं आत्महत्या केली आहे. महिलेनं आत्महत्येपूर्वी हातांवर तिची व्यथा मांडली. स्वत:च्या हातांवर महिलेनं आत्महत्येमागचं कारण लिहिलं. सूरतमधील लिंबायत परिसरातील राहत्या घरी महिलेनं आयुष्य संपवलं. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

महिला पतीच्या त्रासाला कंटाळली होती. तिनं तिला होत असलेला त्रास स्वत:च्या हातांवर पेनानं लिहिला. ‘मला जगायचं आहे. पण माझा पती मला खूप त्रास देत आहे,’ असं महिलेनं हातांवर लिहिलं. घरातील छताला असलेल्या हुकच्या आधारे गळफास घेऊन महिलेनं आयुष्य संपवलं. महिलेचा पती रिक्षा चालवतो. मूळची झारखंडची रहिवासी असलेली महिला लिंबायत परिसरात पती प्रविण गोस्वामीसोबत वास्तव्यास होती. मृत महिलेला दोन मुलं आहेत. आठ वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता.
खेळता खेळता अस्वस्थ वाटू लागलं, १६ वर्षांची मुलगी कोसळली, निपचित पडली; हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू
महिलेला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी १०८ नंबरवर फोन करून रुग्णवाहिका मागवली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून तपास सुरू केला.

काही दिवसांपूर्वी हरयाणाची राजधानी गुरुग्राममध्येही अशीच घटना घडली. एका २५ वर्षीय नवविवाहितानं हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. आत्महत्येसाठी तिनं सासरच्यांना जबाबदार धरलं. माझ्या मृत्यूनंतर माझ्या सासरच्यांना माझा चेहरादेखील दाखवू नका, हीच माझी शेवटची इच्छा आहे, असं तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
डोरेमॉनमध्ये दाखवलेलं, तेच केलं! चिमुकल्यानं वापरली कार्टून ट्रिक; इमारत कोसळूनही जीव वाचला
हातावर सुसाईड नोट लिहिणाऱ्या नवविवाहितेनं पाच पानी पत्रात आत्महत्येची कारणं नमूद केली होती. मी माझ्या सासरच्या माणसांच्या टोमण्यांना कंटाळले आहे. माझे अंत्यसंस्कार माझ्या गावी करण्यात यावेत. सुवासिनीप्रमाणे माझ्यावर अंत्यविधी केले जाऊ नयेत. सुवासिनींच्या वस्तू माझ्या अंत्यविधीला नसाव्यात, अशी शेवटची इच्छा तिनं लिहिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here