अबुधाबी: संयुक्त अरब अमिरातमध्ये भीक मागणं कायद्यानं गुन्हा आहे. मात्र राजधानी अशा प्रकारचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस वास्तव पाहून चक्रावले. पोलिसांना एका भिकारी महिलेकडे लग्झरी कार आणि प्रचंड प्रमाणात रोख रक्कम सापडली. महिला दररोज शहरातील मशिदींबाहेर भीक मागायची. त्यानंतर ती लग्झरी कारनं घरी जायची. एका व्यक्तीला महिलेवर संशय आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

मशिदींच्या बाहेर भीक मागणाऱ्या महिलेवर एका व्यक्तीला संशय आला. त्यानं याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर या महिलेबद्दल चक्रावून टाकणारी माहिती उघड झाली. महिला दिवसभर वेगवेगळ्या मशिदींच्या बाहेर भीक मागायची. भीक मागू झाल्यानंतर ती बरंच चालत कापायची. पोलिसांनी तिचा पाठलाग केला. तेव्हा ती महिला एका महागड्या लग्झरी कारमधून जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. महिला लग्झरी कार चालवत घरी जायची. पोलिसांनी तिला पकडलं. त्यावेळी तिच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. ही रक्कम जप्त करत पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
मित्रांसोबत लपाछपी खेळत होता मुलगा; ६ दिवसांनी ३२१८ किमी दूर सापडला; ऍम्बुलन्स आणावी लागली
गेल्या वर्षाच्या ६ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरच्या कालावधीत १५९ भिकाऱ्यांना अटक केल्याची माहिती अबुधाबी पोलिसांनी दिली. भीक मागणं हा सामाजिक गुन्हा असून त्यामुळे समाजाची प्रतिमा मलीन होत असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. भीक मागणं हे एक अतिशय असभ्य काम आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये हा एक गुन्हा आहे. भिकारी फसवणूक करून सर्वसामान्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतात, असं पोलीस म्हणाले.
VIDEO: बेपत्ता चिमुरड्यासाठी शोधाशोध; मगरीनं पाठीवर घेत बोटीपर्यंत आणलं; पाहून सगळेच चकित
भीक मागितल्यास संयुक्त अरब अमिरातमध्ये शिक्षेची तरतूद आहे. भीका मागताना आढळल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि पाच हजार दिनार (जवळपास १ लाख ११ हजार रुपये) इतका दंड होऊ शकतो. एखादी व्यक्ती टोळी तयार करून भीक मागत असल्याचं आढळल्यास सहा महिन्यांचा कारावास आणि एक लाख दिनार (जवळपास २२ लाख १७ हजार रुपये) दंड इतकी शिक्षा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here