नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अॅण्ड मॉडर्ना इंककडून संयुक्तरीत्या ही चाचणी सुरू आहे. या अंतिम टप्प्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना खरी लस देण्यात आली की डमी लस दिली आहे, याची माहिती देण्यात आली नाही. लशीचे दोन डोस दिल्यानंतर त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. यापैकी कोणत्या स्वयंसेवकांच्या गटांना संसर्ग होतोय हेही पाहिले जाणार आहे. अमेरिकेतील ज्या भागांमध्ये करोनाचा सर्वाधिक फैलाव झाला आहे, त्या भागात हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. मॉडर्ना लशीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ४५ स्वयंसेवकांचा सहभाग होता. या स्वयंसेवकांमध्ये करोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढली होती. त्याशिवाय हलकासा ताप येण्यासारखी काही साइड्स इफेक्टही आढळली होती. अमेरिकेतील ८७ ठिकाणी या लशीची चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास ३० हजारजणांना ही लस टोचण्यात येणार आहे. करोनाच्या बचावापासून ही लस किती प्रभावी आहे, याचाही शोध घेण्यात येणार आहे.
वाचा:
वाचा:
देशामध्ये वापरण्यात येणारी लशीची चाचणी स्वत: करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. त्यामुळे या लशीच्या चाचणीवर सरकारची देखरेख आहे. या अंतिम टप्प्यातील चाचणी ही लस कितपत सुरक्षित आहे, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर वैज्ञानिक या लशीची तुलना करणार आहे. पुढील महिन्यात ऑक्सफोर्डच्या लशीची चाचणी होणार असून सप्टेंबर महिन्यात जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, ऑक्टोबरमध्ये Novavaxच्या लशीची चाचणी सुरू होणार आहे.
वाचा:
या वर्षाअखेरपर्यंत या लशीच्या चाचणीचे अंतिम ठोस निष्कर्ष समोर येतील असा अमेरिकन सरकारला विश्वास आहे. लस विकसित करण्यासाठी अमेरिकन सरकारने मॉडर्ना कंपनीला मोठ्या प्रमाणावर अर्थ साहय्य केले आहे. पहिल्या दोन टप्प्यातील चाचणीही यशस्वी झाली असल्याचे कंपनीने म्हटले होते. मात्र, या चाचणीशी संबंधित माहिती कंपनीने जाहीर केली नव्हती.
वाचा:
दरम्यान, चीनची वैद्यकीय क्षेत्रातील कंपनी Sinopharm ने विकसित केलेल्या ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अबुधाबीत सुरू करण्यात आली आहे. या चाचणीच्या अंतिम टप्प्यात १५ हजार स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये जवळपास २०० देशांच्या नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळेच या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत १८ ते ६० वर्षापर्यंतच्या वयोगटातील स्वयंसेवकांचा समावेश आहे.
जगभरातील काही देशांमध्ये लस विकसित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जवळपास १३ लशी क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चीनच्या लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. चीनच्या पाच, ब्रिटन २, अमेरिकेत ३, रशिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियात प्रत्येकी एक लस क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Thanks so much for the blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.