पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून रोडसाइड रोमियोंमुळे विनयभंगाचे प्रकारही वाढत आहेत. मात्र शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात एका विचित्र घटनेची नोंद करण्यात आली आहे. सख्ख्या बहिणीने आपल्या लहान बहिणीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १८ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरात एक १८ वर्षीय तरुणी आपल्या मोठ्या बहिणीसह एका रो हाऊसमध्ये राहते. उच्च शिक्षित असलेली मोठी बहीण विवाहित असून ती आपल्या माहेरीच राहते. २३ जानेवारी रोजी फिर्यादी लहान बहीण ही हॉलमध्ये झोपलेली असताना आरोपी मोठ्या बहिणीने तिच्याशी अश्लील चाळे केले. तरूणीला हा प्रकार चुकीचा वाटल्याने तिने पोलीस ठाण्यात धाव घेत मोठ्या बहिणीविरोधात फिर्याद दिली आहे.

पोहायला गेलेली ३ मुलं परतलीच नाहीत; पाण्याशेजारी कपडे आढळल्याने बुडाल्याची भीती

दरम्यान, याप्रकरणी आरोपी मोठ्या बहिणीवर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र तरुणीने आपल्या लहान बहिणीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here