वडोदरा: टीम इंडियामध्ये एकीकडे मालिका सुरु आहेत तर दुसरीकडे लग्नसमारंभ सुरु आहेत. भारताचे दोन क्रिकेटपटू हल्लीच विवाहबंधनात अडकले आहेत. केएल राहुल पाठोपाठ भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने आपली प्रेयसी मेह पटेल हिच्याशी २६ जानेवारी रोजी विवाह केला आहे. या नव्या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, अक्षर पटेल आणि मेहा पटेल खूप सुंदर दिसत आहेत. त्याचबरोबर या फोटोंमध्ये हे कपल पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले दिसत आहे. चला तर मग बघूया अक्षर आणि मेहाच्या लग्नाचे फोटो.

अक्षर पटेलच्या लग्नाचे आणि त्यांच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अक्षर पटेल आणि मेहा पटेल यांनी गेल्या वर्षी २० जानेवारी रोजी एंगेजमेंट केली होते आणि आता दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.

वाचा: Republic Day: फक्त मैदानावरच नव्हे, या खेळाडूंनी लष्कराच्या गणवेशातही उंचावली

अक्षर पटेलचे लग्न वडोदरामध्ये झाले. लग्नासाठी अक्षरची वरात खास कारमधून निघाली.अक्षर पटेलने वरातीतून स्टायलिश एन्ट्री केली आणि विंटेज कारमध्ये बसून लग्नासाठी पोहोचला. यावेळेस त्याचे कुटुंबीयही तिथे उपस्थित होते. लग्नापूर्वीच्या मेहंदी, हळद या सर्व विधींचे फोटो सोशल मिडियायावर व्हायरल झाले होते. पण खास आकर्षण होते ते म्हणजे सांगितलं सोहळ्यातील या नव्या जोडप्याचा डान्स. या दोघांनी ‘तू मान मेरी जान’ या गाण्यावर डान्स केला. याचाही व्हिडीओ आपण खाली पाहू शकता. अक्षरच्या लग्नाला क्रिकेटपटू जयदेव उनाडकट आणि त्याच्या पत्नीने उपस्थिती लावली होती. जयदेवने सोशल मीडियावर नव्या जोडप्याचा फोटोही शेअर केला आहे.

हेही वाचा: ‘शोले 2 लवकरच येत आहे…’, कर्णधार हार्दिक पंड्याची घोषणा, धोनीसोबत शेअर केला फोटो

वाचा: फक्त १ विकेट आणि युझवेंद्र चहल इतिहास रचणार, टी-२० मध्ये मोठा विक्रम आपल्या नावे

Akshar Patel and Meha patel wedding Photos

अक्षर पटेलच्या पत्नीबद्दल सांगायचे तर, मेहा व्यवसायाने आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ञ आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते आणि फोटो शेअर करत असते. दुसरीकडे, पटेलने आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे काही काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान कायम ठेवले आहे. अक्षरने चेंडू आणि बॅट या दोन्ही बाजूंनी चमकदार कामगिरी करत भारतासाठी अनेक वेळा सामने जिंकले आहेत. दोघांनीही काही दिवसांपूर्वी स्वत:साठी नवीन मर्सिडीज बेंझ सी क्लास कार खरेदी केली होती, ज्याचे फोटो मेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.

वाचा: लाइव्ह सामन्यात शुभमन गिलला पाहून ‘सारा भाभी..’ चे नारे, कोहलीची मजेशीर रिऍक्शन;

Akshar Patel and Meha patel wedding Photos

अक्षर पटेलने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. मात्र, भारतीय संघाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका क्लीन स्वीप करत जिंकली. आता भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. अक्षरने लग्नासाठी या दोन्ही मालिकांमधून ब्रेक घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here