औरंगाबाद : घराबाहेर खेळत असताना विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना २६ जानेवारी रोजी संध्याकाळी हर्सूल परिसरातील फातेमानगर येथे घडली. शेख नाजिम शेख वसीम (रा.फातेमानगर, हर्सूल परिसर ) असं मृत मुलाचे नाव आहे.
बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या नाजिमला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
दरम्यान, चिमुकल्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.