कोलकातामध्ये नोकरीला असलेली व्यक्ती कामावरून परतल्यानंतर गेल्या रविवारी आजारी पडली. करोना चाचणीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या व्यक्तीचा रिपोर्ट शुक्रवारी आला. त्यात ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले. रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात प्रशासनाने संबंधित व्यक्तीला दाखल करून घेण्यासाठी त्याच्या घरी अॅम्ब्युलन्स पाठवली. या पण अॅम्ब्युलन्स पोहोचण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
घरी पोहोचलेल्या अॅम्ब्युलन्सने संबंधित व्यक्तीचा मृतदेह नेण्यास नकार दिला. पोलीस यासंदर्भात निर्णय घेतील, असं सांगून अॅम्ब्युलन्स चालक निघून गेला. यानंतर संबंधित कुटुंबाने प्रशासनाची अनेक तास वाट बघितली. कित्येक तास वाट बघितल्यानंतर काही कर्मचारी त्यांच्या घरी आले. त्यांनी कुटुंबीयांना पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट (पीपीई किट) दिले. आणि मृत व्यक्तीच्या दोन मुलांना त्यांच्या वडिलांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यास सांगितले आणि निघून गेले.
प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे कुटुंब अडचणीत आले. मग स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. पण स्थानिक नागरिकांनी त्यांना अंत्यस्कार करण्यास मज्जाव केला. यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे? असा प्रश्न कुटुंबासमोर होता. कुठलाही पर्याय न उरल्याने अखेर मृत व्यक्तीच्या दोन मुलांनी पीपीई किट घातले. घरामागे खड्डा खोदून रात्री उशिरा त्यांना मृतदेह पुरवा लागला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.