Pune Crime News : रागाच्या भरात एका तरुणाने स्वतःचा (Pune News) बंगला आणि चारचाकी (Crime) गाडी पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शिरूर तालुक्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे हा प्रकार घडला आहे. गावात यात्रा सुरु असताना हा प्रकार घडला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. त्यांनी आणि नागरिकांनी मिळून आग विझवली. पोलिसांनी स्वतःचीच बंगला आणि कार पेटवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. 

सध्या अनेक तरुण रागाच्या भरात टोकाची पावलं उचलल्याच्या घटना आपण ऐकतो, पाहतो. कधी चाकू हल्ला, तर कधी हाणामारी करतात. पण पुण्यातील या पठ्ठ्यानं रागाच्या भरात घर आणि लाखो रुपयांची गाडी पेटवली आहे. त्याच्या या कृत्याची सगळीकडे चांगलीच चर्चा सुरु आहे.  शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे हा प्रकार घडला. प्रज्योत तांबे असे तरुणाचे नाव आहे. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचे आई वडिल वाजेवाडी या गावात काही कामासाठी गेले होते. त्याचवेळी प्रज्योत यानं घराच्या बाजूला पार्क केलेल्या गाडीला आग लावली. त्यानंतर तो घरात शिरला आणि घरात शिरुन घरातील वस्तुंना आग लावली.  गाडीने पेट घेतल्याने चारही टायर आणि गाडीच्या एसीच्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर तरुणानं तिथून पळ काढला. यात गाडी जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला…

घराला लागलेली आग पाहून शेजारी घाबरले. मात्र शेजाऱ्यांनी पाण्याची मोटार चालू करुन आग विझवली. शेजारी आग विझवतपर्यंत कार जळून खाक झाली होती. शिवाय घरातील सर्व धान्य, कपडे यांसह काही महागड्या वस्तू जळून खाक झाल्या होत्या. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यापैकीक काहींनी पोलिसांना आग लागल्याची माहिती दिली. 

news reels reels

आग लावली अन् तामाशात जाऊन बसला…

प्रज्योतनं घराला आणि गाडीला आग लावली आणि गावात सुरू असणाऱ्या यात्रेतील तमाशात जाऊन बसला. प्रज्योत तामाशात आहे, असं पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी थेट तमाशात जाऊन प्रज्योतची शोधा शोध केली. त्यावेळी प्रज्योत तामाशात रमलेला दिसला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here