पुणे: पुणे-अहमदनगर महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यातील कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन येथे स्विफ्ट डिझायर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याला वैद्यकीय मदत देण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात रुग्णवाहिका चालक व त्याच्या शेजारील आणखी एक जखमी झाला आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

स्विफ्ट डिझायर व दुचाकीच्या अपघातात महेश गव्हाणे नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाली. सणसवाडी गावच्या हद्दीत कल्पेश वनज फाट्याजवळ रुग्णवाहिकेचे चालक वैभव डोईफोडे यांचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. रुग्णवाहिकेनं श्रीकांत सुर्यकांत उबाळे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. अपघातात श्रीकांत यांचा मृत्यू झाला. तर रुग्णवाहिका चालकासह त्याच्या शेजारी बसलेले अक्षय रविंद्र बनसोडे या अपघातात जखमी झाले आहेत. या दुहेरी अपघातानं एकच खळबळ उडाली होती.
मला जगायचंय, पण…; ज्या हातांवर मेहंदी काढली, त्याच हातांवर व्यथा मांडत आयुष्य संपवलं
पुणे-नगर महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढत चाललं असून यात तरुणांच्या मृत्यूंचं प्रमाण अधिक आहे. या घटनेनं काही काळ वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली आहे. या विचित्र अपघाताने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here