पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या गोळीबाराने या परिसरात खळबळ उडाली होती. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात वर्गणी कोण जास्त देणार, यावरुन व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरील वादावादीतून गोळीबार झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून त्यात गोळीबार करणार्‍या व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत संतोष सेवू पवार (वय ३५, रा. बावधन) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रमेश बद्रिनाथ राठोड आणि देवा ऊर्फ देविदास सोमनाथ राठोड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच देवा राठोड याला अटक केली आहे.

महाराष्ट्र हादरला! २३ वर्षीय तरुणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, प्रेमसंबंधातून घरच्यांनीच संपवले

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हा पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये रोहिदास चोरगे याच्याविरुद्ध फिर्यादी संतोष पवार यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. भविष्यात फिर्यादीला त्रास होऊ नये, याकरीता रमेश राठोड (गोळी लागलेला जखमी आरोपी) याला फिर्यादी संतोष पवार यांनी मध्यस्थी करण्यास सांगितलं होतं. त्यात राठोड याने मध्यस्थी केल्यामुळे जुलै २०१५ पासून आजपर्यंत वेळोवेळी भेटून पैशांची मागणी केली. मात्र तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ५ ते ६ लाख रुपये रोखीने वसूल केले आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री पुन्हा गोळीबार झाला. त्यावेळी आरोपींनी पवार यांच्याकडे पैशाची मागणी करुन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here