नवी दिल्ली : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात स्थित रिसर्च फर्म, हिंडेनबर्गचा अहवाल अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाला चांगलाच महागात पडत आहे. रिसर्च फर्मचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून, अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये खळबळ उडाली आणि फक्त दोन दिवसात समभागात मोठ्या प्रमाणात घसरत नोंदवण्यात आली आहे. शेअर्सच्या जोरदार घसरणीचा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नेटवर्थवरही वाईट परिणाम झाला. यापूर्वी फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनर्स इंडेक्समध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर विराजमान गौतम अदानी आता सातव्या क्रमांकावर पडले आहेत.

Hindenburg Vs Adani: हिंडेनबर्गचे ते ८८ प्रश्न कोणते, अदानी समूह अजूनही नाही देऊ शकला उत्तरे

अहवालाने अदानींचे प्रचंड नुकसान
गेल्या वर्षी म्हणजे २०२२ साली जगातील टॉप-१० अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक कमाई करणारे गौतम अदानी यांना वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा फटका बसला. अदानी गेल्या वर्षी यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते, मात्र २०२३ ची सुरुवात त्यांच्यासाठी वाईट ठरण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक होते, परंतु २४ जानेवारीला अमेरिकन रिसर्च फर्म, हिंडेनबर्गचा अहवाल प्रकशित झाला आणि अदानी समूहाच्या घसरणीचे सत्र सुरु झाले. अदानी समूहाचे मार्केट कॅप अवघ्या दोन दिवसांत २.३७ लाख कोटी रुपयांनी घसरले असून यामुळे गौतम अदानी यांची संपत्तीही ९७.६ अब्ज डॉलरवर इतकी राहिली आहे.

अदानींच्या शेअर्सची गडगडाट सुरूच; काही तासात गमावले २.३७ लाख कोटी, Hindenburg ची आग बाजारात

Gautam Adani Net Worth

फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनर्स इंडेक्सनुसार, बातमी लिहिपर्यंत, गौतम अदानी टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरले. या उलटफेरमुळे अदानींच्या खाली असेलेले वॉरन बफे, बिल गेट्स आणि लॅरी एलिसन यांनी क्रमवारीत उसळी घेतली आहे. तसेच यादीत समाविष्ट इतर अब्जाधीशांबद्दल बोलायचे तर, दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ८३.२ अब्ज डॉलर्ससह जगातील ११व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

आता कारवाई कराच… गौतम अदानींना Hindenburg Research चे ओपन चॅलेंज

जगातील अतिश्रीमंत को
ण?
विश्वातील अब्जाधीशांच्या यादीत झालेल्या बदलानुसार फ्रांसचे अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ड टॉप-१० यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती २१५ अब्ज डॉलरइ आहे. त्यांच्यानंतर टेस्ला आणि ट्विटर सीईओ एलन मस्क १७०.१ अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर तर ॲमेझॉनचे सह-संस्थापक जेफ बेझोस यांनी १२२.४ अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह जगातील तिसऱ्या श्रीमंत व्यक्तीचे मुकुट काबीज केले आहे. उल्लेखनीय की, गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीचा सर्वाधिक फायदा अब्जाधीश लॅरी एलिसन यांना झाला आणि ते चौथ्या स्थानावर सरकले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here