जालना : बाईक आणि लोडिंग रिक्षाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, परंतु अपघातानंतर मदत करायची सोडून रिक्षा चालक पसार झाले. जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील धोपटेश्वर जवळ काल (गुरुवारी दि.२६ जानेवारी रोजी) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.

मोटरसायकल व लोडिंग रिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २६ वर्षीय तरुण ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. अपघात झाल्यानंतर मदत करायची सोडून, अपघातग्रस्त तरुणाचा जीव वाचवायचा सोडून अपघाताच्या ठिकाणावरून लोडिंग रिक्षाचालक फरार झाला. त्यामुळे जमलेल्या जमावाने संताप व्यक्त केला आहे. या तरुणाला वेळेवर मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचला असता, असं बोललं जात आहे.

बदनापुर तालुक्यातील धोपटेश्वर जवळ काल दुपारी मोटरसायकल क्रमांक MH-21- BT-9741 व एका लोडिंग रिक्षाची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार साजेद लालखा पठान (वय २६ वर्ष, रा मांजरगाव ता बदनापुर जि जालना) हे गंभीर जखमी झाले होते. अपघात झाल्यानंतर साजेद हे रस्त्यावर पडून होते. येणाऱ्या जाणाऱ्यांनी आजूबाजूच्या लोकांनी ही घटना पाहताच तिकडे धाव घेतली आणि साजेद यांना तात्काळ जालना येथील दवाखान्यात हलविले. पण त्याची प्रकृती गंभीरच असल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटीमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाल्याने साजेद यांची प्राणज्योत मालवली. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी साजेद यांना तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा :गोरेगावातील २२ मजली इमारत, रात्री २.१५ वाजता धप्पकन् आवाज झाला, रहिवाशांनी पाहिलं तर…
या अपघातानंतर साजेद यांना मदत करायचे सोडून लोडिंग रिक्षा चालक घटनास्थळापासून फरार झाल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करीत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात आली.

हेही वाचा : खडेश्वर बाबा मठात चोर शिरले, महंतांच्या अंगठ्या लुटल्या, देवघरावर नजर पडताच म्हणाले, नको…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here