मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाशी युती करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे सध्या विरोधक सोडून महाविकास आघाडीच्याच नेत्यांना अडचणीत आणताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. परंतु, शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी त्याचीही पत्रास न बाळगता संजय राऊत यांच्या सल्ल्यालाही केराची टोपली दाखवली.

ठाकरे गटाशी युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करुन घेण्याच्यादृष्टीने पावले पडतील, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी पु्न्हा एकदा शरद पवार यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रक्रियेला खीळ घातली आहे. ‘शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल’, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. याशिवाय, शरद पवार यांच्याशी अत्यंत जवळीक असणाऱ्या संजय राऊत यांनीही प्रकाश आंबेडकरांना सांभाळून बोलण्याचा सल्ला देत त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे स्पष्ट केले होते.
जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या एका वाक्यावर १० लाखांचा उसळलेला जनसमुदाय शांत झाला होता…!
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी अशी वक्तव्यं करणे योग्य नाही. शरद पवार हे राज्यातीलच नव्हे तर देशातील उत्तुंग नेते आहेत. देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जात असताना त्याचे स्तंभ शरद पवार आहेत. महाविकास आघाडीत सामील होण्याच्या तयारीत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याविषयी आदर ठेऊन बोलले पाहिजे’, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. परंतु, यावर प्रकाश आंबेडकर यांनी नमते घेण्याची भूमिका सोडाच पण संजय राऊत यांच्या शिवसेनेतील (ठाकरे गट) स्थानाबाबत आणि अधिकारांविषयी शंका उपस्थित केली.

MIM विषयी खंत, ठाकरेंकडून अपेक्षा, शिवसेनेशी युती का केली? आंबेडकरांचं एका वाक्यात उत्तर

प्रकाश आंबेडकरांनी राऊतांच्या सल्ल्याला केराची टोपली दाखवली

संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर सारवासारव करतील किंवा वक्तव्य माघारी घेतील, अशी चर्चा होती. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी उलट आपल्या लेखी संजय राऊत यांना फार महत्त्व नसल्याचे दाखवून दिले. ‘मला हा सल्ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी दिला असता तर तो मी मानला असता . हे वक्तव्य करुन प्रकाश आंबेडकर यांनी राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सल्ल्याला एकप्रकारे केराची टोपली दाखवली आहे. तसेच वंचित महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास कोणा एका व्यक्तीचं नेतृत्त्व नसेल, तर सामूहिक नेतृत्त्व असेल’, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here