वसंत पंचमीनिमित्त लखिसरायमध्ये दरवर्षी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. गुरुवारी संध्याकाळी त्रिपुरारीचा मुकाबला पवन कुमारशी होता. पवननं त्रिपुरारीला चितपट करण्यासाठी डाव टाकला. त्रिपुरारी जमिनीवर पडला. काही वेळ झाला तरीही तो उठला नाही. त्रिपुरारीचा मृत्यू झाल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलं. त्यानंतर एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्पर्धास्थळी पोहोचले. त्यांनी त्रिपुरारीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
जाणूनबुजून त्रिपुराराची हत्या; कुटुंबीयांचा आरोप
त्रिपुरारीची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्रिपुरारीपेक्षा अधिक सामर्थ्यशाली प्रतिस्पर्ध्यासोबत जाणूनबुजून त्याचा सामना आयोजित करण्यात आला. प्रतिस्पर्धानं मुद्दामहून त्याची मांडी त्रिपुरारीच्या मानेवर दाबली. त्यामुळेच त्रिपुरारीचा जीव गेला, असा आरोप त्रिपुरारीचे नातेवाईक असलेल्या मुनचुन सिंह यांनी केला.
Home Maharashtra wrestler dies, कुस्ती रंगली, पैलवानानं डाव टाकला; प्रतिस्पर्धी उठलाच नाही, कुटुंबाला वेगळाच...